T20 World Cup 2022: टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये सुपर-12 पातळीवरील सामन्यांत ग्रुप 1 मधील लढतीत आयर्लंडने इंग्लंडला पराभूत केले. पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार खेळवला गेला. त्यात इंग्लंडला विजयासाठी 5 धावा कमी पडल्या. आयर्लंडने इंग्लंडवर 5 विकेट्सनी मात केली.
पात्रता फेरीतून वर आलेल्या आयर्लंडने विजेतेपदाचे दावेदार असलेल्या इंग्लंडला पराभूत केल्याने ग्रुप 1 मधील विजयांच्या समीकरणावर परिणाम होऊ शकतो. तथापि, पाऊस पडला असला तरी आयर्लंडने इंग्लंडला फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाही चांगलेच झुंजवले.
इंग्लंडने आयर्लंडचा डाव 157 धावात संपवला. आयर्लंडने पहिल्या 10 षटकात इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला. सलामीवीर आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्निनेने 47 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी करत 12 व्या षटकातच धावफलकावर संघाचे शतक झळकावले. तेव्हा आयर्लंडची अवस्था 2 बाद 103 होती.
तथापि, त्यानंतर इंग्लंडच्या मार्क वूड, लिम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी टिच्चून गोलंदाजी करत आयर्लंडचा डाव 19.2 षटकांत 157 धावात संपुष्टात आणला. इंग्लंडकडून मार्क वूड आणि लिम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर सॅम करनने 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.
158 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा निम्मा संघ 86 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आयर्लंडने इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजीला चांगलेच झुंजवले. मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत संघाला 14.3 षटकात 105 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पावसामुळे सामना थांबला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा संघ 5 धावांनी पराभूत झाला. आयर्लंडकडून जोशुआ लिटिलने 2 बळी घेतले.
तर हँड आणि बॅरी मॅकार्थे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडकडून डेविड मलानने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर मोईन अलीने 12 चेंडूत नाबाद 24 धावा करत इंग्लंडच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र इंग्लंडला विजयासाठी 5 धावा कमी पडल्या. कर्णधार जोस बटलर शुन्यावर तर स्टार खेळाडू बेन स्टोक्स अवघ्या 6 धावा करून बाद झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.