Chennai Super Kings Dainik Gomantak
क्रीडा

Chennai Super Kings: प्लेऑफमध्ये पोहोचताच CSK ला मोठा धक्का, 'हा' मॅचविनर IPL 2023 मधून अचानक बाहेर

Manish Jadhav

IPL 2023 Chennai Super Kings: एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळला.

या सामन्यात चेन्नईने 77 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र प्लेऑफ सामन्यांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे.

एक मोठा मॅचविनर खेळाडू हंगामाच्या मध्यात संघ सोडून मायदेशी परतला. सीएसकेला आता या खेळाडूशिवाय हा सीजन खेळावा लागणार आहे.

प्लेऑफमध्ये पोहोचताच CSK ला मोठा धक्का बसला

फिटनेसच्या समस्येशी झुंजत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे.

बेन स्टोक्सने पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेच्या तयारीसाठी मोसमातून परतण्याचा निर्णय घेतला आहे. 31 वर्षीय अष्टपैलू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने डिसेंबर 2022 च्या लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

चेन्नईकडून त्याला फक्त दोनच सामने खेळता आले ज्यात, त्याने सात आणि आठ धावा केल्या. त्याने केवळ एकच षटक टाकले होते, ज्यात त्याने 18 धावा दिल्या होत्या. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या साखळी सामन्यातही बेन स्टोक्स प्लेइंग 11 चा भाग नव्हता.

ऍशेस मालिकेच्या तयारीसाठी घेतलेला निर्णय

शनिवारी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर स्टोक्स मायदेशी परतला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेला 16 जूनपासून सुरुवात होणार आहे.

ऍशेसच्या तयारीच्या संदर्भात इंग्लंड 1 जूनपासून लॉर्ड्सवर आयर्लंडविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात बेन स्टोक्सही खेळताना दिसणार आहे.

IPL 2023 मध्ये CSK ची कामगिरी

चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्जने 8 सामने जिंकले आहेत तर 5 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने लीग मुक्कामाच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणारा दुसरा संघ बनला. CSK 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT