IPL 2023: शिवम दुबेने मोडला कॅप्टन कूलचा रेकॉर्ड, एकाच मोसमात...

IPL 2023 मधील 67 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.
Shivam Dube &MS Dhoni
Shivam Dube &MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 मधील 67 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात CSK ने 77 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आलेल्या CSK च्या संघाने 223 धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावा करता आल्या. या सामन्यात षटकार ठोकणाऱ्या शिवम दुबेने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

शिवम दुबेने दमदार खेळी खेळली

शिवम दुबेने दमदार फटकेबाजी केली. तीन षटकार मारल्यानंतर दुबेने महेंद्रसिंग धोनीला एका मोठ्या विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले. दुबेने या मोसमात 33 षटकार मारले आहेत.

CSK साठी, तो आता एकाच मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुबेने IPL 2018 मध्ये 30 षटकार मारणाऱ्या धोनीला मागे टाकले आहे.

Shivam Dube &MS Dhoni
IPL 2023: चेन्नई प्लेऑफचं डायरेक्ट तिकीट मिळवणार की दिल्लीचा शेवट गोड होणार? पाहा Playing XI

वॉटसन अव्वल स्थानी

सीएसकेसाठी एकाच मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शेन वॉटसन अव्वल स्थानी आहे. वॉटसनने 2018 मध्ये सीएसकेसाठी 35 षटकार मारले.

दुसऱ्या क्रमांकावर ड्वेन स्मिथ आहे, ज्याने 2014 मध्ये 34 षटकार ठोकले होते. याशिवाय, 2018 मध्ये 34 षटकार मारणारा अंबाती रायडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सीएसकेचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत दुबेला अव्वल स्थान गाठण्याची उत्तम संधी आहे.

सीएसकेसाठी एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज:

35- शेन वॉटसन (2018)

34- ड्वेन स्मिथ (2014)

34- अंबाती रायुडू (2018)

33- शिवम दुबे (2023)*

30- एमएस धोनी (2018)

Shivam Dube &MS Dhoni
IPL 2023: चेन्नई प्लेऑफचं डायरेक्ट तिकीट मिळवणार की दिल्लीचा शेवट गोड होणार? पाहा Playing XI

दिल्लीचे फलंदाज अपयशी ठरले

या सामन्यात 223 धावांचा पाठलाग करताना दिल्ली सुरुवातीपासूनच सामन्यात कुठेही नव्हती. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची (David Warner) 86 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ 5, फिल सॉल्ट 3 आणि रिले रुसो पहिल्याच चेंडूवर बाद झाले. याशिवाय, यश धुलने 13 आणि अक्षर पटेलने 17 धावा केल्या. सीएसकेकडून दीपक चहरने सर्वाधिक 3 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com