CSK  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: CSK ची प्रतीक्षा संपली! गुजरातचा बिमोड करण्यासाठी 'हे' अष्टपैलू खेळाडू संघात दाखल

CSK: यापूर्वी टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अनेक व्हिडिओ चेन्नई संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले होते.

Manish Jadhav

Chennai Super Kings: आयपीएल सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिग्गज अष्टपैलू खेळाडू संघात सामील झाले आहेत आणि लवकरच सराव सत्र करताना दिसणार आहेत.

यापूर्वी टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अनेक व्हिडिओ चेन्नई संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले होते. चेन्नईसाठी हे आयपीएल खूप खास असणार आहे. कर्णधार धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, असे मानले जात आहे.

हे दोन घातक अष्टपैलू शिबिरात सामील झाले

31 मार्च रोजी गुजरात विरुद्ध आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.

अष्टपैलू बेन स्टोक्स आणि मोईन अली यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करुन ही माहिती दिली आहे. चेन्नईने ट्विट करुन लिहिले - प्रतीक्षा संपली.

आयपीएलमधील बेन स्टोक्सची आकडेवारी

जगातील घातक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये 43 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या 920 धावा आहेत.

आयपीएलमध्येही त्याची दोन शतके आहेत. एवढेच नाही तर त्याने गोलंदाजी करताना 28 विकेट्सही घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बेन स्टोक्स दुखापतीमुळे त्रस्त झाला होता.

असे मानले जात होते की, स्टोक्स आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो, परंतु स्टोक्सने स्वत: या अटकळांना पूर्णविराम दिला आणि सांगितले की, तो सीएसकेसाठी संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल.

मोईन अलीची आयपीएल आकडेवारी

या अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 44 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 910 धावा आहेत आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये त्याने 5 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 76 आहे.

गोलंदाजी करताना त्याने 24 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) 31 मार्चला होणार आहे.

मागील हंगाम संघासाठी खूप वाईट होता. अशा स्थितीत चेन्नईला या मोसमाची सुरुवात विजयाने करायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT