Indian Premier League 2023: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. हा आयपीएलचा १६ वा हंगाम आहे. पण या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक संघाना खेळाडूंच्या दुखापतींचा जोरदार धक्का बसला आहे.
आता नव्या अपडेट नुसार चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे गेल्यावर्षी दमदार कामगिरी केलेल्या गोलंदाजांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. क्रिकबझने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार सीएसकेचा २६ वर्षीय गोलंदाज मुकेश चौधरी आणि लखनऊचा २४ वर्षीय गोलंदाज मोहसीन खान यांचे आगामी हंगामात खेळणे कठीण आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेले हे दोघेही खेळाडू सध्या दुखापतींचा सामना करत आहेत. त्यांनी आपल्या कौशल्याने आणि क्षमतेने गेल्यावर्षी प्रभावित केले होते.
याबद्दल सीएसकेचे सीइओ यांनी माहिती दिली आहे की ते अद्यापही मुकेश चौधरीची प्रतिक्षा करत आहेत. पण त्यांनी फार अपेक्षा ठेवलेल्या नाही. पण जर तो या हंगामाला मुकला तर ते नक्कीच दुर्दैवी असेल. मुकेश सध्या त्याच्या पाठीच्या दुखापतीवर बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.
मुकेशने गेल्यावर्षी दीपक चाहरच्या अनुपस्थितीत सीएसकेसाठी चांगली कामगिरी करताना १३ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच मोहसिनही सध्या दुखापतीने त्रस्त आहे. तो जरी सध्या लखनऊ संघाबरोबर असला तरी, त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. त्याने गेल्यावर्षी लखनऊकडून ९ सामने खेळताना १४ विकेट्स घेतल्या होत्या.
या हंगामाला ३१ मार्चपासून गतविजेते गुजरात टायटन्स विरुद्ध चारवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.