Bhavin patel winning silver medal in table tennis at Tokyo Paralymp Dainik Gomantak
क्रीडा

‘टोकियो’तील पदकाने जीवनात बदल: भाविना

पॅरालिंपिक टेबल टेनिस पदकविजेतीचे मत, अर्जुन पुरस्काराने होईल स्वप्नपूर्ती

Kishor Petkar

पणजी : कोण ही भाविना पटेल (Bhavin patel) असा प्रश्न पूर्वी लोक विचारायचे, टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले आणि जीवनच बदलून गेले. आता प्रत्येकजण ओळखतो. पदक खूप आनंद देणारे आहे, असे मत टोकियो पॅरालिंपिक (Tokyo Paralymp) स्पर्धेतील महिला टेबल टेनिस (table tennis) एकेरीत उपविजेती ठरलेली भाविना पटेल हिने शुक्रवारी व्यक्त केले.

भाविनाने यावर्षी टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. पॅरालिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. आता तिची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. त्याविषयी गुजरातही ही जिगरबाज खेळाडू म्हणाली, ‘‘मला प्रशिक्षकांनी मागे सांगितले होते, की मी एकदिवस नक्कीच अर्जुन पुरस्काराची मानकरी ठरेन. त्यांचे शब्द आता खरे होणार आहेत. हा पुरस्कार भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोत्तम असल्याने माझ्यासाठी अविस्मरणीय स्वप्नपूर्ती आहे. मी उत्साहित झालेय.’’

गुजरातचे माजी क्रिकेटपटू, भारताच्या 19 वर्षांखालील संघातून खेळलेले निकुल पटेल हे भाविनाचे पती. दांपत्य सध्या गोव्यात असून आज होणाऱ्या कार्यक्रमात भाविनाच्या उपस्थितीत ‘गोवा दिव्यांग हक्क संघटने’चा 18वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.

तेव्हा नैराश्य आले होते...

भाविनाचा 2016 साली रिओ पॅरालिंपिक स्पर्धेतील सहभाग थोडक्यात हुकला होता. त्याविषयी ही 34 वर्षीय खेळाडू म्हणाली, की ‘‘रिओ ऑलिंपिकची संधी हुकल्याने प्रचंड नैराश्य आले होते. सारा निधी संपला होता, त्यामुळे पुढे काय हा प्रश्नही सतावू लागला. माझे वडील किराणा दुकानदार. आर्थिक ओढाताणीत त्यांनी धीर दिला. अडचणीच्या कालखंडात वडील, पती आणि कुटुंबीयांनी दिलेली साथ खूप मौल्यवान ठरली. त्यामुळेच टोकियो स्पर्धेसाठी जास्त मेहनत घेऊ शकले.’’

टेबल टेनिसवर मनापासून प्रेम

‘‘कंप्युटर सायन्स अभ्यासक्रमासाठी मी अहमदाबादला आले. तेथे ब्लाईंड पीपल असोसिएशनच्या संपर्कात आल्यानंतर मी २००४-२००५ पासून टेबल टेनिस खेळू लागले. आयुष्याच्या वाटचालीत नवी दिशा गवसली. टेबल टेनिसमुळे मी खूपच आनंदित बनले. त्यामुळेच खेळावर मी मनापासून प्रेम करते,’’ असे भाविना म्हणाली.

‘सोच बदलना जरूरी है...’

देशातील दिव्यांग गुणवान आहेत, पण त्यांच्या गुणवत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना, दिव्यांगाप्रती ‘सोच बदलना जरूरी है...’ असे भाविनाने ठासून सांगितले. दिव्यांगाबाबत भारत आणखीनच ‘सुलभ’ बनणे आवश्यक असून सरकारकडून तशी अपेक्षा असल्याचे मतही तिने व्यक्त केले. लोक सहानुभूती व्यक्त करताना दिव्यांग असल्याची जाणीव करून देतात याच्या जास्त वेदना होतात, अशी खंत भाविनाने व्यक्त केली.

भाविना पटेल हिच्याविषयी...

- 2020 टोकियो पॅरालिंपिकमध्ये टेबल टेनिस महिला एकेरीत रौप्यपदक

- 2018 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदक

- 2020 इजिप्तमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकेरी, सांघिक सुवर्णपदक

- 2019 बँकॉक पॅरा ओपन स्पर्धेत एकेरी, सांघिक सुवर्णपदक

- 2013 थायलंड ओपन स्पर्धेत सांघिक सुवर्ण

- 8 वेळा राष्ट्रीय स्पर्धेत विजेती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT