तळावलीच्या विजयात स्टेसीचे पाच गोल

75 व्या आणि 90+1 व्या मिनिटास गोल नोंदवत स्टेसीने तळावलीच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामन्याची मानकरी पुरस्कार स्वीकारताना युनायटेड क्लब तळावलीची स्टेसी कार्दोझ
सामन्याची मानकरी पुरस्कार स्वीकारताना युनायटेड क्लब तळावलीची स्टेसी कार्दोझ Dainik Gomantak

पणजी: कर्णधार स्टेसी कार्दोझ हिने नोंदविलेल्या पाच गोलच्या बळावर युनायटेड क्लब तळावली संघाने गोवा फुटबॉल (Football) असोसिएशनच्या महिला फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी दणदणीत विजय नोंदविला. त्यांनी यंग बॉईज ऑफ टोंक स्पोर्टस क्लबचा 7-0 फरकाने धुव्वा उडविला. सामना धर्मापूर येथील मैदानावर झाला.

तळावली संघ पूर्वार्धात तीन गोलने आघाडीवर होता. स्टेसी हिने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास पहिला गोल केला. 20 व्या मिनिटास कॅरेन एस्ट्रोसियो हिने संघाच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली.

सामन्याची मानकरी पुरस्कार स्वीकारताना युनायटेड क्लब तळावलीची स्टेसी कार्दोझ
मेव्हनच्या गोलमुळे एफसी गोवाची घोडदौड

स्टेसी हिनेच 29 व्या मिनिटास आणखी एक गोल नोंदवत तळावलीची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर रिझेला आल्मेदा (Rizella Almeida) हिने 55 व्या मिनिटास गोल केला. नंतर 67 व्या मिनिटास स्टेसीने हॅटट्रिकचा मान मिळविला. 75 व्या आणि 90+1 व्या मिनिटास गोल नोंदवत स्टेसीने तळावलीच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com