IND vs SA
IND vs SA Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

दैनिक गोमन्तक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जूनमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर, दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारताचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी ठिकाण जाहीर केले आहे. त्यानुसार हे पाचही सामने कटक, विशाखापट्टणम (Visakhapatnam), दिल्ली, राजकोट आणि चेन्नईमध्ये होणार आहेत. (Before the World Cup, there will be a five-match T20 series between Team India and South Africa)

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने 2 मार्च रोजी झालेल्या शिखर परिषदेच्या बैठकीत या मालिकेची माहिती देताना, त्यासाठी ठिकाणांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, बीसीसीआयच्या वेबसाइटवरुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, ही मालिका 9 जूनपासून सुरु होणार असून पाचवा आणि शेवटचा सामना 19 जून रोजी होणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी होणारी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांना त्यांच्या तयारीची चाचणी घेण्याची ही संधी असेल.

तसेच, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सलग तीन T20 मालिका क्लीन स्वीप करुन ICC क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने आतापर्यंत 12 सामने जिंकले आहेत.

शिवाय, या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला होता, तर कसोटीत 1-2 ने मालिका गमावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT