तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिकेकडून 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. 288 धावांच्या लक्ष्याला प्रत्यत्तर देताना भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ गेला आणि थोड्या फरकाने हुकला. या प्रभावाचे प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी आहे. गेल्या सामन्यात 85 धावा करणारा ऋषभ पंत (Rishbha Pant) पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याशिवाय कर्णधार केएल राहुलही अपयशी ठरला आणि त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. पंत बाद झाल्यानंतर दुसऱ्या टोकाला उभा असलेला विराट कोहली (Virat Kohli) त्याच्याकडे रागाने पाहत होता. या सामन्यात कोहलीने 65 धावा केल्या.
पंत (Pant) फलंदाजीसाठी जेव्हा मैदानावर आला तेव्हा भारताची धावसंख्या 2 बाद 116 होती आणि संघाला मजबूत भागीदारीची गरज होती. पण पंतने चांगले खेळण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आणि पुन्हा एकदा खराब शॉट खेळून त्याची विकेट घेतली. पंत जेव्हा स्ट्राईकवर होता तेव्हा चेंडू अँडिले फेहलुकवायोच्या हातात होता. फेहलुकवायोच्या शेवटच्या चेंडूवर पंतने क्रीझच्या बाहेर येऊन डीप पाईंटवरून शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही आणि सिसाडा मगालाने बाऊंड्रीवर बाद केले. पंत बाद झाल्यानंतर त्याच्यासोबत क्रीजवर उपस्थित असलेला विराट कोहली चांगला संतापलेला दिसत होता.सी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंत मैदानातून बाहेर जात असताना दुसऱ्या बाजूला उभा असलेला विराट त्याच्याकडे एकटक रागाने होता. या व्हिडिओमध्ये (Video) विराट रागावल्याचे स्पष्ट दिसत आहे. विराट काही बोलला नाही पण त्याचे हावभाव पाहून तो पंतवर रागावला आहे हे स्पष्ट दिसत होते. पंतने एकदिवसीय सामन्यात तीन डावात 33. 67 च्या सरासरीने ऐकून 101 धावा केल्या. मात्र दुसऱ्या वनडे मॅचमध्ये त्याने सिक्सर मारला तेव्हा कोहली नाचताना दिसला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.