Cameron Green | Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final: 'थर्ड अंपायरचा निर्णय...', वादग्रस्त कॅचबद्दलच्या पोस्टनंतर BCCI उपाध्यक्षांचा गिलला अप्रत्यक्ष टोला

कॅमेरॉन ग्रीनने शुभमन गिलचा घेतलेल्या कॅचवर बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rajeev Shukla on Cameron Green's controversial catch: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हलवर सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचा झेल वादग्रस्त ठरला. त्यानंतर त्यानेही सोशल मीडियावर त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. पण याबद्दल बीसीसीआय नाराज असल्याचे समजत आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या शुभमन गिलला खडसावलं आहे.

भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. पण 8 व्या षटकात स्कॉट बोलंडने गिलला 18 धावांवर बाद केले. त्याचा कॅमेरॉन ग्रीनने गलीच्या क्षेत्रात झेल घेतला.

पण हा झेल ग्रीनने चेंडू खूप खाली झेलला होता. त्यामुळे चेंडू जमीनीवर लागला आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण तिसऱ्या पंच रिचर्ड केटलबोरो यांनी गिलला बाद दिल्याने त्याला 18 धावांवर माघारी परतावे लागले.

दरम्यान, चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पंचांच्या निर्णयावर गिलने सोशल मीडिया पोस्टमधून नाराजी व्यक्त केली. गिलने ग्रीन झेल घेत असतानाचा फोटो शेअर करताना भिंगाचे इमोजी कॅप्शनमध्ये टाकले आहेत.

याबद्दल एएनआयशी बोलताना राजीव शुक्ला यांनी म्हटले की 'आपण यावर वाद निर्माण करायला नको. तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय आपण स्विकारला पाहिजे.'

तसेच शुक्ला यांनी आशा व्यक्त केली आहे की भारत आव्हान पूर्ण करून इतिहास रचेल. ते म्हणाले, 'अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली चांगली फलंदाजी करत आहेत आणि जर सर्वजण चांगले खेळले, तर आपण आव्हान पूरण करू, कारण आव्हान खूप मोठे नाही.'

ग्रीननेही दिली प्रतिक्रिया

चौथ्या दिवसाच्या खेळानंतर ग्रीनलाही या झेलाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्याने उत्तर दिले की 'त्यावेळी मी नक्कीच विचार केला की मी झेल घेतला आहे. मला वाटते ते त्यावेळी परिस्थितीला धरून केलेली कृती होती.'

'मला वाटले होते की मी स्पष्टपणे झेल घेतला आहे, म्हणून मी चेंडू वरही फेकला आणि कोणत्याही प्रकारचे साशंकतेचे भाव दाखवले नाहीत. पण नंतर हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला आणि त्यांनी तो निर्णय दिला.'

विजयाची दोन्ही संघांना संधी

या अंतिम सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने 444 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात 3 बाद 164 धावा केल्या आहेत. अद्याप भारताला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सची गरज आहे.

चौथ्या दिवशी भारताकडून विराट कोहली 44 धावांवर आणि अजिंक्य राहणे 20 धावांवर नाबाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT