BCCI took action against Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराटने कर्णधारपद सोडलं की BCCI ची कारवाई ?

साडेचार वर्षे टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला बीसीसीआय सन्मानजनक मार्ग देऊ इच्छित होता, परंतु त्याने बोर्डाचे ऐकले नाही

दैनिक गोमन्तक

रोहित शर्मा (Rohit Sharma) T-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधारही बनला आहे. बुधवारी, एक मोठी घोषणा करताना, बीसीसीआयने (BCCI) मर्यादित षटकांच्या फॉरमॅटची कमान विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी रोहित शर्माकडे दिली हाये .मात्र काही सूत्रानुसार विराटला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही टीम इंडियाचे नेतृत्व करायचे होते पण बीसीसीआयची योजना वेगळी होती. वृत्तानुसार, बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधारपद सोडण्यासाठी 48 तासांचा अवधी दिला होता पण त्याने तसे केले नाही.(BCCI took action against Virat Kohli)

साडेचार वर्षे टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला बीसीसीआय सन्मानजनक मार्ग देऊ इच्छित होता, परंतु त्याने बोर्डाचे ऐकले नाही, त्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून खूप काही साध्य केले आहे पण तो ICC ट्रॉफी जिंकू शकला नाही आणि तीच गोष्ट त्याच्या विरोधात गेली. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2017, विश्वचषक 2019 आणि टी20 विश्वचषक 2021 जिंकता आले नाही.

तर दुसरीकडे विजयांच्या बाबतीत, विराट कोहली हा भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 95 पैकी 65 सामने जिंकले आहेत आणि त्यांची विजयाची टक्केवारी 68 टक्क्यांहून अधिक होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 19 पैकी 15 द्विपक्षीय मालिका जिंकल्या. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका येथे मालिका जिंकल्या आहेत. कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.एवढेच नाही तर कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी केली. त्याने 72.65 च्या सरासरीने 5449 धावा केल्या ज्यात 21 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या 20 वर्षांतील सर्व भारतीय कर्णधारांची शतके जोडली तर त्याचा आकडाही 19 इतका आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून स्वतःची वेगळी छाप सोडल्याचे स्पष्ट झाले आहे, जे कदाचित कोणीही नाकारू शकणार नाही.

तर आता विराटाच्या जागी रोहित शर्मा टीम इंडियाच्या कर्णधारपदावर असणार आहे. रोहित शर्मासाठी आगामी दोन वर्षे आव्हानात्मक आहेत. रोहित शर्माचे पहिले आव्हान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका आहे जिथे त्याला विजयाने सुरुवात करायची आहे. टीम इंडियाला 2022 साली ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि 2023 मध्ये वर्ल्ड कप भारतात आहे आणि रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीकडून टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्याची अपेक्षा असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT