Jai Shah & Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

BCCI उभारणार नॅशनल क्रिकेट अकादमी

बीसीसीआय (BCCI) बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा आणखी विस्तार करणार आहे. देशातील नव्या आणि मोठ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील क्रिकेट पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआय बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा आणखी विस्तार करणार आहे. देशातील नव्या आणि मोठ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jai Shah) यांच्यासह BCCI उच्च पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पायाभरणी केली. (BCCI To Set Up National Cricket Academy)

दरम्यान, यावेळी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये गांगुली आणि शाह यांनी परंपरा आणि चालीरीतींनुसार या अकादमीची पायाभरणी केली. बीसीसीआयच्या अध्यक्षांनी समारंभाचे फोटो शेअर करताना ट्विट केले की, "आज नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम सुरु होत आहे.... बंगळुरुमध्ये आज नवीन अकादमीची पायाभरणी झाली आहे."

तसेच, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla), कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, सहसचिव जयेश जॉर्ज आणि एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्या उपस्थितीत पायाभरणी करण्यात आली. सचिव जय शाह यांनीही ट्विट करुन ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. बीसीसीआय सचिवांनी लिहिले, "बीसीसीआयने नवीन एनसीएची पायाभरणी केली आहे. प्रतिभेचे पालनपोषण आणि भारताच्या क्रिकेट इकोसिस्टमला समर्थन देणारे उत्कृष्ट केंद्र बनणे ही आमची सामूहिक दृष्टी आहे."

शिवाय, बीसीसीआयला ही जमीन 99 वर्षांसाठी लीजवर मिळाली आहे. नवीन NCA वर्षभरात तयार होण्याची अपेक्षा आहे, ज्यात तीन मैदाने आहेत जिथे घरच्या मैदानावरही सामने होऊ शकतात. बेंगळुरुमध्येच स्थित विद्यमान NCA ची स्थापना 2000 मध्ये झाली होती ही अकादमी एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरात कार्यरत होती. स्टेडियमची मालकी असलेल्या कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने BCCI ला इनडोअर सराव सुविधा आणि आधुनिक जिम याशिवाय मैदानी सरावासाठी बी मैदान भाड्याने दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT