IPL  Dainik Gomantak
क्रीडा

'आयपीएल'चे मीडिया हक्क विकून 'बीसीसीआय' होणार मालामाल

बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल मीडिया हक्कांसाठी टेंडर जारी केले आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पैशांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. आता भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) या स्पर्धेतून अधिक कमाई करण्याचा विचार करत आहे. (BCCI to make money by selling IPL broadcast rights)

बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल मीडिया हक्कांसाठी टेंडर जारी केले आहे. हे टेंडर 2023 ते 2027 साठी आहे. बीसीसीआयने या टेंडरसाठी एकूण 33 हजार कोटी रुपये मूळ किंमत ठेवली आहे. सध्या हे टेंडर 74 सामन्यांनुसार ठरविण्यात आले असून, त्यात दहा संघ सहभागी होणार आहेत. मात्र, बीसीसीआयने (BCCI) टेंडरमधील सामन्यांची संख्या वाढवण्याचा पर्यायही ठेवला आहे.

बीसीसीआय 33 हजार कोटींची कमाई कशी करणार?
क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयला फक्त भारतीय उपखंडात आयपीएल (IPL) प्रसारित करण्यासाठी प्रति सामन्यासाठी 49 कोटी रुपये मिळतील. याशिवाय प्रक्षेपणाची डिजिटल किंमत प्रति सामन्यासाठी 33 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. अनेक कंपन्या टेंडरसाठी अर्ज करणार आहेत. लिलावात चुरशीची शर्यत असेल, असा अंदाज आहे. सध्या आयपीएल मीडिया अधिकार स्टार नेटवर्ककडे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

SCROLL FOR NEXT