ICC Rankings: रवींद्र जडेजा पुन्हा बनला जगातील नंबर वन ऑलराउंडर

जडेजानंतर (Ravindra Jadeja) रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Dainik Gomantak

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत दहाव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पुन्हा जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. जडेजानंतर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. मार्नस लॅबुशेन पहिल्या स्थानावर कायम आहे, तर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वनडे क्रमवारीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर आहे. (Ravindra Jadeja has once again become the number one all-rounder in the ICC Test rankings)

दरम्यान, उस्मान ख्वाजाला सर्वाधिक फायदा झाला आहे, ज्याने 2022 मध्ये 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला सहा अंकाचा फायदा झाला असून त्याने रोहित आणि विराटला मागे टाकले आहे.

Ravindra Jadeja
ICC T20 Rankings: श्रेयस अय्यरचे बल्ले-बल्ले, विराट टॉप-10 मधून बाहेर !

चार ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा टॉप 10 मध्ये समावेश

कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत चार ऑस्ट्रेलियन फलंदाज अव्वल 10 मध्ये आहेत. मार्नस लॅबुशेन पहिल्या तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, उस्मान ख्वाजा सातव्या तर ट्रॅव्हिस हेड नवव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या आणि इंग्लंडचा जो रुट चौथ्या स्थानावर आहे. बाबर आझम पाचव्या तर दिमुथ करुणारत्ने सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे मात्र, भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली पहिल्या 10 फलंदाजांमधून बाद होण्याच्या मार्गावर आहे. तो दहाव्या स्थानावर घसरला आहे. तर रोहित शर्मा आठव्या स्थानावर आहे.

Ravindra Jadeja
ICC ODI Rankings: हीट मॅन लवकरच टाकणार विराट कोहलीला मागे!

गोलंदाजांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर

दुसरीकडे मात्र, गोलंदाजांच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे अश्विन दुसऱ्या तर रबाडा तिसऱ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराहही चौथ्या स्थानावर कायम आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला एका स्थानाचा फायदा झाला असून ती पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, काइल जेमिसन एका स्थानाच्या नुकसानासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. टीम साऊथी सातव्या, नील वॅगनर आठव्या, जेम्स अँडरसन नवव्या आणि जोश हेझलवूड दहाव्या स्थानावर आहे.

Ravindra Jadeja
ICC ODI Ranking मध्ये मिताली राजचा जलवा, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजाला टाकले मागे

ट्रेंट बोल्ट वनडेमध्ये नंबर वन गोलंदाज ठरला

वनडेतील गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या सात स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, बांगलादेशचा शाकिब अल हसन चार स्थानांचा फायदा घेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खानही एका स्थानाने प्रगती करत संयुक्तरित्या नवव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पाही नवव्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com