Harmanpreet Kaur  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023 ला काही तासच उरले असताना BCCI ने बदलली MI vs GG मॅचची वेळ, 'या'वेळी सुरु होणार थरार

वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात होणाऱ्या पहिल्या सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.

Pranali Kodre

WPL 2023: शनिवारी म्हणजेच 4 मार्च 2023 ही तारीख भारतीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शनिवारी पहिल्या महिला आयपीएलला म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे.

पाच संघात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेला शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात होणाऱ्या सामन्याने सुरुवात होणार आहे. दरम्यान, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

हा सामना याआधी शनिवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार होता. मात्र आता हा सामना अर्ध्यातासाने पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणजेच आता हा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल, तर 7.30 वाजता नाणेफेक होईल.

या सामन्याआधी होणाऱ्या डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन सोहळ्यामुळे ही वेळ बदलण्यात आल्याची शक्यता आहे. उद्घाटन सोहळ्याला संध्याकाळी 5.30 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्यासाठी आणि सामन्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांसाठी संध्याकाळी ४ वाजताच गेट उघडे करण्यात आले आहेत.

दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात अनेक सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड स्टार कियारा अडवाणी आणि क्रिती सेननबरोबरच गायक एपी धिल्लोन यांचे परफॉर्मन्स होणार आहेत. त्याचबरोबर शंकर महादेवन डब्ल्यूपीएलचे अँथम सादर करणार आहेत.

या हंगामात एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील 20 सामने साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीनंतर गुणतालिकेतील अव्वल क्रमांकाचा संघ थेट अंतिम सामना खेळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणारा संघ एलिमिनेटरचा सामना खेळेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

या हंगामात स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रोड्रिग्ज यांसारख्या भारतीय स्टार खेळाडूंबरोबरच हेलिसा हेली, ऍश्ले गार्डनर, नतालिया स्किव्हर, एलिस पेरी यांसारख्या स्टार परदेशी खेळाडू देखील खेळताना दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT