Sourav Ganguly & Jai Shah Dainik Gomantak
क्रीडा

BCCI ला SC चा दिलासा, गांगुली अन् जय शाह पुढील तीन वर्षे पदावर राहू शकणार

Supreme Court: बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court give Big Relief to BCCI: बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. याशिवाय, जय शाह पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे सचिव राहतील. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बोर्डाच्या घटनेत बदल करण्यास परवानगी दिली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. त्याचवेळी, सौरव गांगुलीशिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह हे पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआय सचिवपदावर राहतील.

बीसीसीआयने मंगळवारी हा युक्तिवाद मांडला होता

बीसीसीआयतर्फे (BCCI) सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला की, “सध्याच्या घटनेत कूलिंग ऑफ पीरियडची तरतूद आहे. जर मी राज्य क्रिकेट असोसिएशनचा एका टर्मसाठी आणि बीसीसीआयचा सलग दुसऱ्या टर्मसाठी पदाधिकारी असेन, तर मला कूलिंग ऑफ पीरियडमधून जावे लागते. दोन्ही संस्था वेगळ्या असून त्यांचे नियमही वेगळे आहेत. नेतृत्व तयार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सलग दोन टर्मसाठी कमी कालावधी मिळतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT