BCCI Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2026: बीसीसीआयचा 'स्ट्रिक्ट' मोड! मिशन वर्ल्ड कपसाठी 'होम मिनिस्टर'ची साथ सुटली; नियमावर बोट ठेवत खेळाडूंना ठणकावलं

BCCI Rejects Team India Players Request: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या शिस्तीबाबत आणि एकाग्रतेबाबत कडक पाऊल उचलले आहे.

Manish Jadhav

BCCI Rejects Team India Players Request: आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या शिस्तीबाबत आणि एकाग्रतेबाबत कडक पाऊल उचलले आहे. स्पर्धेच्या काळात खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबाला राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती टीम मॅनेजमेंटने बोर्डाकडे केली होती.

मात्र, खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होऊ नये आणि त्यांचे पूर्ण लक्ष केवळ खेळावर असावे, यासाठी बीसीसीआयने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. बोर्डाच्या या निर्णयामुळे आता वर्ल्ड कपच्या पूर्ण कालावधीत टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबीयांसोबत राहता येणार नाही, ज्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.

वास्तविक, बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या वास्तव्याबाबत आधीच एक विशेष नियमावली (पॉलिसी) तयार केली आहे. या नियमानुसार, भारतीय खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासोबत परदेश दौऱ्यावर जास्तीत जास्त 14 दिवस राहू शकतात. पण, हा नियम केवळ अशाच दौऱ्यांसाठी लागू होतो जे 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे असतात. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप प्रामुख्याने भारत आणि श्रीलंकेत होत असून तो केवळ एका महिन्याचा आहे. त्यामुळे बोर्डाने नियमावर बोट ठेवत खेळाडूंना कोणतीही सवलत देण्यास नकार दिला. बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मुभा आहे, मात्र ते टीम हॉटेलमध्ये खेळाडूंसोबत राहू शकणार नाहीत.

स्पर्धेच्या सुरुवातीलाच संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या पत्नींना प्रवास करण्याची आणि राहण्याची परवानगी मागितली होती. बीसीसीआयने ही शिफारस फेटाळून लावताना स्पष्ट केले की, वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळाडूंना कोणत्याही प्रकारचे विचलित करणारे वातावरण नको आहे. खेळाडूंनी स्वतःच्या खर्चाने कुटुंबाला आणले तरी त्यांना बायो-बबल किंवा टीमच्या ठराविक नियमावलीचे पालन करावे लागेल आणि ते खेळाडूंच्या रुममध्ये किंवा एकाच हॉटेलमध्ये राहू शकणार नाहीत. बोर्डाचा हा कठोर पवित्रा आगामी कठीण सामन्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे समजते.

टीम इंडियाने (Team India) आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात दिमाखात केली असून पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये आणखी तीन महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. यामध्ये सर्वात मोठा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतरचे उर्वरित साखळी सामने आणि सुपर-8 चे सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहेत. घरच्या मैदावर खेळत असतानाही बोर्डाने खेळाडूंना कुटुंबापासून दूर ठेवून शिस्तीचा नवा पायंडा घातला आहे. आता खेळाडू या मानसिक दबावाचा सामना करत वर्ल्ड कप उंचावतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT