Ishan Kishan X/BCCI
क्रीडा

Ishan Kishan: इशान किशनला बीसीसीआयचे फर्मान, IPL पूर्वी 'या' महत्त्वाच्या सामन्यात खेळावे लागणार

Pranali Kodre

Ishan Kishan Controversy:

भारतीय क्रिकेट संघ एकीकडे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे अनेक भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत आहेत. मात्र, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन मात्र कोणताही स्पर्धात्मक सामना खेळताना दिसत नाहीये, ज्यामुळे तो आता अडचणीतही येण्याची शक्यता आहे.

मीडियातील वृत्तानुसार बीसीसीआयने इशानला झारखंडच्या अखेरच्या रणजी सामन्यात खेळण्याचे आदेश दिले आहेत. झारखंडला यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये पुढील फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्यांना आता अखेरचा साखळी सामना १६ फेब्रुवारीपासून राजस्थानविरुद्ध खेळायचा आहे.

बीसीसीआय आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना देशांतर्गत किमान ठराविक सामने खेळण्याची सक्ती करणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनेही म्हटले होते की जर इशानला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल, तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे लागेल.

इशान गेल्यावर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून अर्ध्यातून परत आला होता. त्याने मानसिक थकव्याच्या कारणाने दौऱ्यातून माघार घेतली होती. मात्र, त्यानंतर अद्याप त्याने कोणताच सामना खेळलेला नाही. हीच गोष्ट बीसीसीआयला खटकली असल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले की 'बीसीसीआयमध्ये निर्णय घेणारे याबाबत जाणून आहेत की काही खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे नाहीये. जर ते खेळाडू भारतीय संघातून बाहेर आहेत, तर ते सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील काही सामने खेळल्यानंतर प्रथम श्रेणीच्या स्पर्धांसाठी आपल्या राज्य संघात सामील होत नाहीत.'

'खेळाडूंना असे करण्यापासून रोखण्यासाठी बोर्ड आता रणजी ट्रॉफीतील तीन - चार सामने खेळणे सक्तीचे करण्याची शक्यता आहे. जर खेळाडूंनी हे सामने खेळले नाही, तर ते आयपीएलमध्ये खेळू शकत नाही किंवा जर त्यांच्या फ्रँचायझीने त्यांना करारमुक्त केले असेल, तर ते लिलावातही उतरू शकत नाही.'

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 'राज्य संघटनांचीही इच्छा आहे की बीसीसीआयने याबाबत कठोर निर्णय घ्यायला हवेत, जेणेकरून काही युवा खेळाडू रणजी ट्रॉफीकडे तुच्छतने पाहाणार नाहीत.'

'हार्दिक पंड्याच्या बाबत समजले जाऊ शकते कारण त्याचे शरिर प्रथम श्रेणी सामन्यांसाठी तितके अजून सशक्त नाही. तो कसोटी क्रिकेटचा वर्कलोड घेऊ शकत नाही आणि तो भारतासाठी आयसीसी स्पर्धांसाठी तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.

'पण काही युवा खेळाडू आहे, त्यांना जेव्हाही तुम्ही सांगा, ते सांगतात की ते फिजिओबरोबर काम करत आहेत. त्यांना कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे.'

दरम्यान, आता इशान झारखंडकडून राजस्थान विरुद्धचा रणजी सामना खेळणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT