MS Dhoni Jersey Retire X
क्रीडा

MS Dhoni Jersey: जर्सी नंबर 7 फक्त धोनीचाच! BCCI ने घेतला मोठा निर्णय

Pranali Kodre

BCCI decided to Retire MS Dhoni's Jersey Number 7:

भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेका भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो तीन वर्षांपूर्वीच निवृत्त झाला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने धोनीने त्याच्या कारकिर्दीत नेहमीच परिधान केलेला जर्सी क्रमांक 7 निवृत्त केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाकडून कोणीही 7 क्रमांकाची आयकॉनिक जर्सी घालू शकणार नाही.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्डकप विजेता कर्णधार धोनीने क्रिकेटमध्ये दिलेल्या त्याच्या योगदानाच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंनाही याबद्दल माहिती देताना सांगितले आहे की यापुढे कोणासाठीही 7 आणि 10 क्रमांकाची जर्सी उपलब्ध असणार नाही.

यापूर्वी 2017 साली बीसीसीआयने 10 क्रमांकाची जर्सीही अधिकृतरित्या निवृत्त केली होती. 10 क्रमांकाची जर्सी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या संपुर्ण कारकिर्दीत परिधान केली होती.

धोनीच्या नावाचा ट्रेंड

दरम्यान, काही दिवसांपासून सोशल मीडियावरही 'थाला फॉर अ रिजन' असा ट्रेंड चालू आहे. यामध्ये धोनीच्या जर्सी क्रमांकाचा संबंध आहे. धोनीला थाला असे टोपन नावही आहे. कोणात्याही गोष्टीत 7 अंक दिसल्यानंतर त्यावर सोशल मीडिया पोस्टमध्ये 'थाला फॉर अ रिजन' असे कॅप्शन दिले जात आहे.

अनेक मोठमोठ्या ब्रँडनेही याबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. तसेच त्याच्या अनेक चाहत्यांनीही त्याच्या प्रेमापोटीही 'थाला फॉर अ रिजन' च्या अनेक पोस्ट केलेल्या दिसून आल्या आहेत. धोनी 2024 मध्ये अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे त्याच्या सन्मानार्थ हा ट्रेंड सुरु झाला असल्याचे म्हटले जात आहे.

भारताचा दिग्गज कर्णधार

कॅप्टनकूल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी भारताच्या दिग्गज कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी स्पर्धांची विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 24 अर्धशतकांसह 5082 धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT