Chetan Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Chetan Sharma resigns: निवड समीतीच्या अध्यक्षपदावरून चेतन शर्मा पायउतार, स्टिंग ऑपरेशननंतर दिला राजीनामा

माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा बीसीसीआय निवड समीतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Pranali Kodre

Chetan Sharma resigns After Sting Operation: माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा बीसीसीआय निवड समीतीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले असून त्यांनी त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला असल्याचे समजत आहे. तसेच असेही समोर आले आहे की जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेटमधील अनेक विषयांवर खळबळजनक दावे केले होते. हे प्रकरण चिघळल्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमधील व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू तंदुरुस्तीसाठी इंजेक्शन घेतात असा दावा केला होता. तसेच त्यांनी विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वादावरही भाष्य केले होते. त्यांनी विराटने गांगुलीविरुद्ध खोटे विधान केल्याचे म्हटले होते.

तसेच काही भारतीय खेळाडूंनी त्यांची घरी येऊन भेट घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. याशिवाय रोहित शर्माला कर्णधार करण्याचा निर्णय संपूर्ण निवड समीतीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. हे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली होती. आता शर्मा यांचा या प्रकरणानंतर राजीनामा आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे जानेवारी महिन्यातच शर्मा यांना सलग दुसऱ्यांदा निवड समीतीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

गेल्यावर्षी 2022 टी20 वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने संपूर्ण निवड समीतीला काढून टाकत नवीन अर्ज मागवले होते. त्यानंतर निवड समीतीच्या एकूण 5 पदांची भरती करताना शर्मा यांना पुन्हा एकदा मुख्य निवडकर्ता म्हणून निवडण्यात आले होते.

दरम्यान, आता शर्मा यांचा राजीनामा आल्याने निवड समीतीमध्ये सलील अंकोला, शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरद हे चार सदस्य राहिले आहेत. बीसीसीआयने अद्याप नव्या अध्यक्षाची निवड केलेली नाही.

पण आता बीसीसीआयला याचा निर्णय लवकर घ्यावा लागणार आहे. कारण अद्याप ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT