Chetan Sharma Sting Operation: चेतन शर्मावर बीसीसीआय अ‍ॅक्शन घेणार? नवी अपडेट समोर

सध्या चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीच्या प्रमुखपदाची धुरा आहे. अलीकडेच त्यांना सलग दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले.
Chetan Sharma 
Sting Operation
Chetan Sharma Sting OperationDainik Gomantak
Published on
Updated on

Chetan Sharma Sting Operation: एका न्यूज चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा अडकले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये, विराट-सौरव वाद, विराट-रोहितमधील मतभेद आणि खेळाडूंमधील बनावट इंजेक्शन या विषयांवर खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

सध्या चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीच्या प्रमुखपदाची धुरा आहे. अलीकडेच त्यांना सलग दुसऱ्यांदा निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले.

काय म्हणाले चेतन शर्मा?

'भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू 80 टक्के तंदुरुस्त असतानाही इंजेक्शन घेतात आणि 100 टक्के तंदुरुस्त होतात. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप चाचणीत सापडत नाहीत.'

'बनावट फिटनेससाठी इंजेक्शन घेणारे हे सर्व खेळाडू क्रिकेटबाहेरचे डॉक्टर आहेत, जे त्यांना शॉट्स देतात. जेणेकरून महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त मानला जाऊ शकतो. असा खुलासा माजी भारतीय क्रिकेटर चेतन शर्मा यांनी केला आहे.

याशिवाय विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंवर देखील अनेक आरोप केलेत. हेड कोच राहुल द्रविड आणि विराट कोहलीसोबतच्या गोपनीय चर्चेचाही खुलासा करण्यात आला आहे.

Chetan Sharma 
Sting Operation
Panjim: तो रस्त्यावर झोपून दिवस काढायचा... अखेर बेघर युवकाला पणजी पोलिसांनी दिला मदतीचा हात

बीसीसीआय चेतन शर्मावर कडक कारवाई करण्याची शक्यता

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय चेतन शर्मावर कडक कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांना मुख्य निवडकर्ता पदावरून हटवले जाऊ शकते असेही मानले जात आहे. BCCI सचिव जय शाह चेतन शर्माच्या भविष्यासंबंधी निर्णय घेतील. असं BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे.

बीसीसीआयने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि प्रमुख हे बीसीसीआयशी करारबद्ध असतात. त्यांना जाहीरपणे संघाशी संबंधित गोष्टी बोलण्याची परवानगी नसते. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार? बीसीसीआय चेतन शर्मा यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com