युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल 2021 (IPL) च्या दुसऱ्या टप्प्यात विदेशी खेळाडूंच्या सहभागाविषयी असणारे प्रश्नचिन्ह आता दूर झाले आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंना (New Zealand players) न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे BCCI ने PCB ला पुन्हा एकदा मात दिली आहे. आयपीएलचा दुसरा टप्पाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, परंतु यालाच टशन देण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडच्या मालिकेचे आयोजन केले. परंतु आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बांगलादेश आणि पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यासाठी आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या न्यूझीलंडच्या संघात समावेश केलेला नाही.
न्यूझीलंडने केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, काइल जैमीसन आणि लॉकी फर्ग्यूसन यांच्यासह अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या दौऱ्यात टॉम लेथम याच्याकडे न्यूझीलंच्या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा एक प्रकारे आयपीएलला टशन देणाऱ्या पाकिस्तानला बीसीसीआयने क्लिन बोल्ड केले आहे.
याबाबत बोलताना न्यूझीलंड बोर्डाने म्हणले की, पाकिस्तान दौऱ्यामध्ये येणाऱ्या आयपीएलमुळे आमच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली होती. आमच्यासाठी हा निर्णय घेणे खूप अवघड होते. कारण आम्ही नेहमीच आयपीएलबाबत विचार केला आहे. परिस्थितीला पाहूनच आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असणारे न्यूझीलंडचे खेळाडू बांगलादेश आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर न जाता आयपीएलमध्ये सहभागी होतील. तर या दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाची कमान टॉम लेथम यांच्या हाती सोपविण्यात येईल. न्यूझीलंडचा संघ 23 ऑगस्ट रोजी बांगलादेशला रवाना होईल. त्यानंतर तेथून पाकिस्तानला जाईल. 2002 मध्ये न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात खेळण्यास गेला त्यावेळी तेथे झालेल्या बॉम्ब स्फोटात 14 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.