Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India Cricket Schedule: BCCI चा धमाका! टीम इंडियाचं 2026-27 मधील देशातील हंगामाचं वेळापत्रक जाहीर; 17 शहरात रंगणार 22 सामन्यांचा थरार

BCCI Home Season 2026-27 Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026-27 या आगामी घरगुती हंगामासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली.

Manish Jadhav

Team India Cricket Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026-27 या आगामी घरगुती हंगामासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा हंगाम अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार असून यादरम्यान टीम इंडिया एकूण 22 सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व सामने देशभरातील 17 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाणार असल्याने क्रिकेटचा उत्साह कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. या संपूर्ण हंगामात वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया असे चार संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. या घरगुती सत्राची सुरुवात सप्टेंबर 2026 मध्ये होणार असून त्याची सांगता जानेवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेसह होईल.

टीम इंडियाच्या (Team India) या घरगुती हंगामाचा श्रीगणेशा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेने 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. हे सामने त्रिवेंद्रम, गुवाहाटी आणि न्यू चंदीगड येथे पार पडतील. त्यानंतर, दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आमनेसामने येतील. टी-20 मालिकेचे सामने लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरु या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यामुळे भारतीय हंगामाला एक धडाकेबाज सुरुवात मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर, डिसेंबर 2026 मध्ये श्रीलंका संघ भारताचा दौरा करेल. या दौऱ्यात प्रत्येकी तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचे आयोजन करण्यात आले. श्रीलंकेविरुद्धचे एकदिवसीय सामने दिल्ली, बंगळुरु आणि अहमदाबाद येथे होतील, तर टी-20 सामन्यांची मेजवानी राजकोट, कटक आणि पुणे या शहरांना मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी 2027 मध्ये, झिम्बाब्वेचा संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतात येईल. भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानचे हे तिन्ही सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई या ऐतिहासिक मैदानांवर खेळवले जातील.

या संपूर्ण घरगुती हंगामातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित मालिका म्हणजे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा. ऑस्ट्रेलियन संघ जानेवारी 2027 मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात (India) येणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत कळीची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका या हंगामाचा 'क्लायमॅक्स' मानली जात आहे. एकूणच, 22 सामन्यांचा हा भरगच्च कार्यक्रम भारतीय खेळाडूंच्या क्षमतेची आणि फिटनेसची कसोटी पाहणारा ठरेल. 17 शहरांमध्ये पसरलेल्या या वेळापत्रकामुळे स्थानिक प्रेक्षकांनाही आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

2026-27 साठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

1. वेस्ट इंडिजचा भारत दौरा (2026)

  • 27 सप्टेंबर 2026: पहिली वनडे, त्रिवेंद्रम

  • 30 सप्टेंबर 2026: दुसरी वनडे, गुवाहाटी

  • 03 ऑक्टोबर 2026: तिसरी वनडे, न्यू चंदीगड

  • 06 ऑक्टोबर 2026: पहिली T20I, लखनौ

  • 09 ऑक्टोबर 2026: दुसरी T20I, रांची

  • 11 ऑक्टोबर 2026: तिसरी T20I, इंदूर

  • 14 ऑक्टोबर 2026: चौथी T20I, हैदराबाद

  • 17 ऑक्टोबर 2026: पाचवी T20I, बंगळुरु

2. श्रीलंकेचा भारत दौरा (2026)

  • 13 डिसेंबर 2026: पहिली वनडे, दिल्ली

  • 16 डिसेंबर 2026: दुसरी वनडे, बंगळुरु

  • 19 डिसेंबर 2026: तिसरी वनडे, अहमदाबाद

  • 22 डिसेंबर 2026: पहिली T20I, राजकोट

  • 24 डिसेंबर 2026: दुसरी T20I, कटक

  • 27 डिसेंबर 2026: तिसरी T20I, पुणे

3. झिम्बाब्वेचा भारत दौरा (2027)

  • 3 जानेवारी 2027: पहिली वनडे, कोलकाता

  • 6 जानेवारी 2027: दुसरी वनडे, हैदराबाद

  • 9 जानेवारी 2027: तिसरी वनडे, मुंबई

4. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (2027)

  • 21 - 25 जानेवारी 2027: पहिली कसोटी, नागपूर

  • 29 जाने - 2 फेब्रु 2027: दुसरी कसोटी, चेन्नई

  • 11- 15 फेब्रुवारी 2027: तिसरी कसोटी, गुवाहाटी

  • 19 - 23 फेब्रुवारी 2027: चौथी कसोटी, रांची

  • 27 फेब्रु - 3 मार्च 2027: पाचवी कसोटी, अहमदाबाद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

SCROLL FOR NEXT