Team India Dainik Gomantak
क्रीडा

BCCI Annual Contract 2022-23: टीम इंडियाचा वार्षिक करार जाहीर! 'या' 26 खेळाडूंना मिळणार कोट्यवधींचा पगार

बीसीसीआयने 2022-23 हंगामासाठी टीम इंडियाचा वार्षिक करार जाहीर केला असून ए+ श्रेणीतील 4 खेळाडूंना 7 कोटींचे मानधन मिळणार आहे. या करारात 4 श्रेणींमध्ये 26 खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे.

Pranali Kodre

BCCI Annual Contract 2022-23: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी 2022-23 हंगामासाठी वरिष भारतीय पुरुष संघाचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यंदा या वार्षिक करारात 26 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयचा हा करार चार श्रेणीत विभागला गेला आहे. ए+, ए, बी आणि सी अशा चार श्रेणी आहेत. ए+ श्रेणीत चार खेळाडू असून त्यांना 2022-23 हंगामासाठी 7 कोटी रुपये मिळतील.

या श्रेणीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. जडेजाला या करारात ए श्रेणीतून ए+ श्रेणीत बढती देण्यात आली आहे. तर विराट, रोहित आणि बुमराह ए श्रेणीत कायम आहेत.

तसेच ए श्रेणीसाठी 5 कोटींचे मानधन असेल. या श्रेणीत हार्दिक पंड्या, आर अश्विनसह एकूण 5 खेळाडूंचा समावेश आहे.

त्याचबरोबर बी श्रेणीत 6 खेळाडू आहेत. त्यांना ३ कोटींचे मानधन मिळणार आहे. या श्रेणीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहे. दरम्यान, केएल राहुलची करारात घसरण झाली आहे. तो गेल्यावर्षी ए श्रेणीत होता. तसेच शुभमन गिलला मात्र सी श्रेणीतून बी श्रेणीत बढती मिळाली आहे.

याशिवाय सी श्रेणीत सर्वाधिक 11 खेळाडू असून त्यांना 1 कोटीचे मानधन मिळेल. या श्रेणीत कुलदीप यादवचाही समावेश असून तो पुन्हा बीसीसीआयचा करार मिळवण्यात यशस्वी झाला आहे. गेल्यावर्षी त्याचे नाव करारात नव्हते.

तसेच इशान किशन दीपक हुडा, अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना पहिल्यांदाच बीसीसीआयच्या वार्षिक करारात स्थान मिळाले आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी कराराच्या यादीत असलेल्या इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, भुवनेश्वर कुमार, मयंक अगरवाल, दीपक चाहर या खेळाडूंनी 2022-23 हंगामाचा वार्षिक करार गमावला आहे. यंदाच्या वार्षिक करारात या खेळाडूंना बीसीसीआयने स्थान दिलेले नाही.

असा आहे बीसीसीआयचा भारतीय पुरुष संघाचा 2022-23 हंगामासाठी वार्षिक करार -

  • ए+ श्रेणी (7 कोटी) - विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह

  • ए श्रेणी (5 कोटी) - हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल

  • बी श्रेणी (3 कोटी) - चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव.

  • सी श्रेणी (1 कोटी) - उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

Smriti Mandhana Marriage: शुभ मंगल सावधान! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख समोर, 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

गोवा बचाव! विरोधी पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते लोहिया मैदानावर एकवटणार; शनिवारी मडगावात कोळसा विरोधी आंदोलन

Shivneri Fort: इतिहासाचे सोनेरी पान उलगडणारी 'शिवजन्मभूमी', नाणेघाटाचे रक्षण करणारा अभेद्य 'शिवनेरी'

SCROLL FOR NEXT