क्रीडा

T20 WC India’s squad: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान

गोमन्तक डिजिटल टीम

ऑस्ट्रेलिया येथे 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकासाठी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळालं आहे.

असा असेल विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

भारतीय संघाच्या सामन्याचे वेळापत्रक

T20 विश्वचषक 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना 02 नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि पाचवा सामना 06 नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

Goa RoadRepair: '..येत्‍या 15 दिवसांत रस्‍ते सुधारू'! CM सावंतांचे आश्‍‍वासन; खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ‘आप’ आक्रमक

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

SCROLL FOR NEXT