Indian Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games साठी महिलांचा भारतीय संघ जाहीर! हरमनप्रीत करणार चीनमध्ये नेतृत्व

Asian Games: बीसीसीआयने एशिनय गेम्ससाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे.

Pranali Kodre

India Women Cricket squad for 19th Asian Games Hangzhou 2022 : चीनमध्ये यावर्षी 19 वी एशियन गेम्स खेळवली जाणार असून यंदा क्रिकेटचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या महिला निवड समीतीने भारतीय संघाची निवड केली आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. त्याचबरोबर या संघात शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दिप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड अशा अनुभवी खेळाडूंना संघात संधी दिली आहे.

याशिवाय मिन्नू मणी, तितास साधू, उमा छेत्री, अनुषा बारेड्डी अशा नवख्या खेळाडूंनाही मुख्य संघात संधी देण्यात आली आहे.

तसेच राखीव खेळाडूंमध्ये हर्लिन देओल, स्नेह राणा, पुजा वस्त्राकर या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

एशियन गेम्समध्ये महिला क्रिकेट संघाची स्पर्धा झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा टी20 क्रिकेट प्रकारात खेळली जाईल.

एशियन गेम्ससाठी भारतीय महिला संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दिप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनज्योत कौर, देविका वैद्य, अंजली सारवानी, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका अहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बारेड्डी.

राखीव खेळाडू - हर्लिन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पुजा वस्त्राकर.

एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेट

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 19 व्या एशियन गेम्सचे आयोजन गेल्यावर्षी सप्टेंबरदरम्यान होणार होते. पण चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली. एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेटचे आयोजन होणार आहे.

यापूर्वी 2010 आणि 2014 साली एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचे आयोजन झाले होते. 2010 मध्ये बांगलादेशच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2014 मध्ये श्रीलंकेच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT