Abhimanyu Easwaran X/BCCIDomestic
क्रीडा

IND A vs ENG A: BCCIकडून 'इंडिया ए'ची घोषणा! इंग्लंड लायन्सचा सामना करण्यासाठी 13 खेळाडूंचा संघात समावेश

India A Squad: इंग्लंड अ संघाविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय अ संघाची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

Pranali Kodre

BCCI announced India ‘A’ squad for warm-up and first multi-day game against England Lions:

इंग्लंडचा संघ या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड या देशांच्या वरिष्ठ क्रिकेट संघात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंड लायन्स (इंग्लंड अ संघ) देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय अ संघ तीन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे.

त्याचमुळे बीसीसीआयने दोन दिवसीय सराव सामना आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध होणाऱ्या पहिल्या चारदिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा केली आहे. हे दोन्ही सामने अहमदाबादला होणार आहेत.

भारतीय पुरुष क्रिकेट निवड समितीने भारतीय अ संघात 13 खेळाडूंची निवड केली आहे. या संघाचे कर्णधारपद अभिमन्यू इश्वरनकडे देण्यात आले आहे. तसेच या संघात यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल आणि केएस भरत यांची निवड झाली आहे.

त्याचबरोबर संघात साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, प्रदेश रंजन पॉल असे प्रतिभावान खेळाडूही आहेत. गोलंदाजांमध्ये नवदीप सैनी, तुषार देशपांडे, आकाश दिप, विद्वथ कावेरप्पा यांचाही समावेश आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार 12-13 जानेवारीदरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम ग्राऊंड बी येथे दोन दिवसीय सराव सामना होईल. तसेच 17 ते 20 जानेवारी दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला प्रथम श्रेणी सामना खेळवला जाणार आहे.

असा आहे भारतीय अ संघ -

अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत (यष्टीरक्षक), मानव सुतार, पुलकित नारंग, तुषार देशपांडे, विद्वथ कावेरप्पा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आकाश दीप.

असा आहे इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडच्या वरिष्ठ संघाच्या भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेताल 25 जानेवारीपासून सुरुवात होणार असून पहिला सामना हैदराबादला खेळवला जाणार आहे.

त्यानंतर 2 फेब्रुवारीला विशाखापट्टणमला दुसरा सामना सुरू होईल, तिसऱ्या सामन्याला 15 फेब्रुवारीला राजकोट येथे सुरुवात होईल. चौथा सामना 23 फेब्रुवारीला रांचीमध्ये सुरू होणार आहे. तर अखेरचा पाचवा कसोटी सामना 7 मार्च रोजी धरमशाला येथे सुरू होईल. इंग्लंडचा हा दौरा 11 मार्च रोजी संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

SCROLL FOR NEXT