Mastercard Launch New Trophy: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी मास्टरकार्ड हा नवा प्रायोजक आहे. भारतात होणाऱ्या सर्व क्रिकेट सामन्यांमध्ये पेटीएम ऐवजी मास्टरकार्ड प्रायोजक असणार आहे. पेटीएमने 2019 मध्ये BCCI सोबत 4 वर्षांसाठी प्रायोजकत्व करार केला होता, परंतु तो करार वेळेपूर्वीच मोडला, त्यानंतर BCCI ने हे अधिकार मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मास्टरकार्डने खास ट्रॉफी मैदानात उतरवली आहे, त्याची खासियत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
मास्टरकार्डची (MasterCard) ही ट्रॉफी खूप खास आहे, दिसायला ही ट्रॉफी काहीशी T20 वर्ल्ड कप ट्रॉफीसारखी दिसते. या ट्रॉफीमध्ये एक खास वैशिष्ट्य देखील आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल की, कोणत्याही संघाला ट्रॉफी मिळाल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेले चाहते खेळाडूंना प्रोत्साहन देतात, पण ही ट्रॉफीच खेळाडूंचा उत्साह वाढवते. हो तुम्ही बरोबर वाचले आहे. या ट्रॉफीमध्ये चाहत्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला असून, त्यामुळे सांघिक सेलिब्रेशनदरम्यान खेळाडूंचा उत्साह वाढणार आहे.
मास्टरकार्ड हे जगातील एक मोठे नाव आहे. त्यांनी UEFA चॅम्पियन्स लीग, ग्रॅमी, कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा यासारख्या मोठ्या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या चार वर्षांपासून मास्टरकार्डचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याचवेळी, पेटीएमने 2015 मध्ये BCCI सोबत चार वर्षांसाठी 203 कोटी रुपयांचा टाइटल स्पॉन्सरशिप करार केला होता, ज्यामध्ये प्रत्येक सामन्यासाठी 2.4 कोटी रुपये दिले गेले होते.
2023 मधील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाका याने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर सूर्यकुमार यादवला या मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.