Litton Das Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023 च्या पहिल्याच दिवशी बांगलादेशला मोठा धक्का! स्टार विकेटकीपर अचानक स्पर्धेतून बाहेर

Pranali Kodre

Bangladesh wicketkeeper-batter Litton Das ruled out of Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळवला जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात सामना होणार आहे.

असे असतानात बांगलादेशला पहिला सामना खेळण्याच्या एक दिवस आधीच मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला ताप आला आहे. त्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो बांगलादेश संघाबरोबर प्रवासही करू शकलेला नाही. आता तो या स्पर्धेतूनच बाहेर झाला आहे.

लिटन दास बांगलादेशच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याने बांगलादेशकडून 72 वनडे सामने खेळताना 2213 धावा केल्या आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बांगलादेशचा माजी वनडे कर्णधार तमिम इक्बालही दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर लिटन दासचे बाहेर होणे, हा बांगलादेशसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बदली खेळाडू

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दासऐवजी 30 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज अनामुल हक बिजोयची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. तो बुधवारी संघाशी जोडला जाईल. बिजोयने बांगलादेशकडून 44 वनडे सामने खेळले असून 3 शतकांसह 1254 धावा केल्या आहेत. तो बांगलादेशकडून अखेरचा वनडे सामना डिसेंबर 2022 मध्ये भारताविरुद्ध खेळला आहे.

बांगलादेशचे सामने

आशिया चषकात बांगलादेशचा समावेश साखळी फेरीसाठी ब गटात समावेश आहे. या गटात बांगलादेशसह अफगाणिस्तन आणि श्रीलंकेचा समावेश आहे.

बांगलादेशला आशिया चषकात 31 ऑगस्टला श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर दुसरा सामना ३ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

  • बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक बिजोय, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक महेदी हसन, नईम शेख, शमीम हुसेन, तनजीद हसन तमीम, तनझिम हसन साकिब

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT