Anamul Haque Twitter/ @Prodhania2
क्रीडा

बांगलादेशी दिग्गजाचा नवा विक्रम, असे करणारा जगातील ठरला पहिला क्रिकेटपटू

बांगलादेशचा (Bangladesh) दिग्गज क्रिकेटर अनामूल हकने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटर अनामूल हकने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए टूर्नामेंटमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा अनामूल हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये अनामूल हकने (Anamul Haque) हा विक्रम केला आहे. या स्पर्धेत अनामूलने 3 शतके झळकावली आहेत. यासह अनामूलने लिस्ट ए क्रिकेटमध्ये (Cricket) 15 शतके झळकावली आहेत. अनामूलने लिस्ट ए टूर्नामेंटमध्ये 1000 हून अधिक धावा करुन एक खास विक्रम तर केलाच त्याचबरोबर टॉम मुडीचा विक्रमही मोडला. मुडीने 1991 साली खेळल्या गेलेल्या संडे लीग स्पर्धेत एकूण 917 धावा केल्या होत्या. (Bangladesh cricketer Anamul Haque has scored over 1000 runs in the List A tournament)

लिस्ट ए लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. 1042 - ढाका प्रीमियर लीग, 2022 मध्ये अनामूल हक

  2. 917 - टॉम मूडी, संडे लीगमध्ये, 1991

  3. 902 - जिमी कुक, संडे लीगमध्ये, 1990

  4. 861 - जॅक रुडॉल्फ, प्रो 40, 2010

दरम्यान, अनामूल हकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास, या क्रिकेटपटूने आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले आहेत आणि 38 एकदिवसीय सामने खेळण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर हकने बांगलादेशकडून (Bangladesh) 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यातही यश मिळवले आहे. अनामूल हकने वनडेत आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत.

तसेच, आनामूल हक बिजॉय हा स्पर्धेच्या मागील सामन्यात लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता. 24 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात शेख जमाल धनमंडी क्लब विरुद्ध त्याने 52 धावांची खेळी केली आणि ही खास कामगिरी करण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या या विक्रमाने टॉम मूडीजचा विक्रम मोडला गेला. मुडीने 1991 साली इंग्लंडच्या (England) संडे लीगमध्ये वूस्टरशायरसाठी 15 डावात 917 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT