जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे. जर रशीद खाननेही (Rashid Khan) निर्धार केला नसता तर गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) कालचा विजय अवघड झाला असता. पण अफगाणी पठाण ठाम होता, स्वतःवर विश्वास ठेवला आणि मग त्याने आपल्या सहकारी खेळाडूला म्हणजेच राहुलला जे सांगितले ते पूर्ण केले. मुंबईतील वानखेडे मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळलेला सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. शेवटचे षटक सुरू होण्यापूर्वी सामना सनरायझर्स हैदराबादकडे झुकला होता. पण तो संपला तेव्हा विजय गुजरातच्या झोतात होता. राशीद खानने संघाच्या पराभवाचे विजयात रूपांतर केले. आणि यामध्ये राहुल तेवतियाचे (Rahul Tewatia) योगदानही तेवढेच महतावाचे होते. (IPL Updates)
ही वेगळी बाब आहे की जेव्हा संघ जिंकला तेव्हा ना राशिद खान सामनावीर ठरला ना राहुलची निवड झाली. पण शेवटी त्यांनी मारलेली बाजी जोरदार होती. त्यांना क्रिकेटप्रेमींचे प्रेम आणि आपुलकी मिळाली. सर्वांनी त्याचे कौतुक केले. दोघांनीही हैदराबादवर अशा प्रकारे छाप पाडली की, ते फक्त त्यांच्या विजयाचे पराभवात रूपांतर होतांना पाहत राहिले. राशिद खानने आधीच जिंकायचे ठरवले होते.
सामन्याच्या शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी 22 धावांची गरज होती. ही स्ट्राईक राहुल तेवतियाकडे होता आणि राशिद खानच्या मनात काय चालले होते, ते त्याने मॅचनंतर सविस्तरपणे सांगितले. गुजरातचा हा 15 कोटी रुपयांचा खेळाडू जिंकण्यासाठी पक्का होता हे त्याने सामना जिंकल्यानंतर बोललेल्या गोष्टींवरून स्पष्ट झाले.
सामन्यानंतर राशिद खान म्हणाला, “जेव्हा शेवटच्या षटकात 22 धावा शिल्लक होत्या. मग मी राहूलकडे गेलो आणि म्हणालो की जेव्हा आपण आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध 25 धावा करू शकतो तर आपण त्यांच्या विरूद्ध धावा का करू शकत नाही. आपला एक चेंडू चुकला तरी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपल्याला फक्त धैर्याने काम करावे लागेल आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामुळे आपला रन रेटही सुधारेल," ही आमची योजना होती. आम्ही भाग्यवान होतो की शेवटच्या षटकात आम्हाल 4 षटकार मारता आले, असे म्हणत राशिदने आपल्या विजयाचं गुपीत सांगितल.
शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सने मिळवला विजय
सनरायझर्ससाठी मार्को यान्सनने शेवटचे षटक टाकले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर राहुलने षटकार खेचला आणि पुढच्या चेंडूवर सिंगल घेत रशीद खानला स्ट्राईक दिली. राहूलने नॉन स्ट्रायकर एंडवर असल्याचे सनरायझर्स हैदराबादला समजत होते, त्यामुळे धोका टळला होता. पण प्रत्यक्षात रशीद खानच त्याच्यासाठी खरा धोका होता. कारण संपूर्ण जाळे त्यांच्यासाठीच घातले गेले होते. रशीदने सामन्यातील शेवटचे 4 चेंडू खेळले, ज्यात तो एक चुकला आणि उर्वरित 3 चेंडूंवर षटकार ठोकून संघाचा विजय निश्चित केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.