Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

Shakib Al Hasan Video: बांगलादेशी कॅप्टन शाकिबला फॅन्सकडून धक्का-बुक्की, कॉलरही खेचली अन्...

Viral Video: बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसनबरोबर चाहत्यांकडून गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Pranali Kodre

Shakib Al Hasan Video: बांगलादेश क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्ध मायेदशात तीन सामन्यांची टी20 मालिका शाकिब अल हसनच्या नेतृत्वात 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. दरम्यान, मैदानातील या शानदार कामगिरीबरोबरच शाकिब मैदानाबाहेरील विविध घटनांमुळेही अनेकदा चर्चेत येत असतो.

शाकिब अनेकदा खेळाडूंशी, पंचांशी किंवा चाहत्यांमध्ये गैरवर्तन करण्यामुळे चर्चेत आला आहे. पण आता त्याच्याबरोबर चाहत्यांकडून झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चाहत्यांच्या गर्दीत तो खाली देखील पडला.

झाले असे की दुबईतील एका कार्यक्रमावरून बाहेर येत असताना अनेक क्रिकेट चाहते तिथे उपस्थित होते. त्यावेळी चाहते त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. फोटो काढण्याच्या प्रयत्नात काही चाहत्यांकडून शाकिबला धक्केही देण्यात आले.

त्याचमुळे तो खाली पडला. पण त्यानंतर त्याने उठून त्या गराड्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही चाहत्यांनी त्याची कॉलरही ओढली. पण त्याच्याबरोबर सुरक्षेसाठी असलेल्या लोकांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत त्याला या गर्दीतून बाहेर काढले. दरम्यान, या परिस्थितीत शाकिब शांत राहिला होता.

गेल्या आठवड्यात चाहत्यावर उचललेला हात

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्याच आठवड्यात बांगलादेशमध्ये असताना एका कार्यक्रमादरम्यान त्याचे चाहत्यांबरोबर वाद झाले होते. झाले असे की चाहत्यांकडून त्याच्याबरोबर चूकीचे वर्तन होत होते, त्यानंतर त्याला राग अनावर झाला आणि त्याने टोपी काढून चाहत्यांना मारले. या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायर झाला होता.

शाकिबची कारकिर्द

खरंतर शाकिब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने बांगलादेशसाठी आत्तापर्यंत अनेकदा शानदार कामगिरी करत विक्रम केले आहेत. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 65 कसोटी सामने खेळले असून 5 शतके आणि 30 अर्धशतकांसह 4367 धावा केल्या आहेत. तसेच 231 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच शाकिबने वनडे क्रिकेटमध्ये 227 सामने खेळताना 9 शतके आणि 52 अर्धशतकांसह 6976 धावा केल्या आहेत. तसेच 300 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचबरोबर शाकिबने 112 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 12 अर्धशतकांसह 2281 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 131 विकेट्सही घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतीय संघाला मोठा धक्का! 'शर्मा जी के लड़के'ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, पोस्ट करत म्हणाला...

VIDEO: 'जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत शांतता नाही', बांगलादेशच्या निवृत्त जनरलनं पुन्हा ओकली गरळ

Raja Mantri Predictions: 2026 मध्ये गुरु 'राजा' तर मंगळ 'मंत्री'! नवीन वर्ष जगात आणि देशात काय मोठे बदल घडवणार?

Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक-गिलचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT