Football Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super league: आणखी एक आयएसएल सामना कोविड `बाधित`

इंडियन सुपर लीग (indian super league) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील आणखी एक सामना कोविडमुळे लांबणीवर टाकण्यात आला.

किशोर पेटकर

पणजी: इंडियन सुपर लीग (indian super league) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील आणखी एक सामना कोविडमुळे लांबणीवर टाकण्यात आला. कोविड बाधितांची तीव्रता वाढल्यामुळे एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) व बंगळूर एफसी यांच्यात फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी ठरल्यानुसार खेळला जाणार नाही.

सामना लांबणीवर टाकण्यात आल्याचे आयएसएलने जाहीर केले. एटीके मोहन बागानचा कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा सलग दुसरा सामना आहे. गेल्या शनिवारी ओडिशाविरुद्धचा सामनाही याच कारणास्तव झाला नव्हता. प्राप्त माहितीनुसार, बंगळूर एफसी संघालाही कोविडचा (Covid19) फटका बसला आहे. शुक्रवारी दोन्ही संघांनी सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद घेतली नव्हती. गोव्यातील (Goa) तीन स्टेडियमवर आयएसएल स्पर्धा सध्या जैव सुरक्षा वातावरणात खेळली जात असून गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरपासून 59 सामने पूर्ण झाले आहेत.

आयएसएलने शनिवारचा सामना लांबणीवर टाकताना नमूद केले, की `प्रत्येक सामन्याचे अनेक घटकांवर मूल्यमापन केले जाते, त्यात क्लबला मैदानावर संघ उतरणविण्याची क्षमता, क्लबमधील कोविड-19 ची तीव्रता, सुरक्षितपणे सामन्यासाठी तयारी आणि खेळण्याबाबत क्लब सदस्यांची तयारी आदींचा समावेश आहे.` विविध जैवसुरक्षा वातावरणातील सदस्यांचे आरोग्य व सुरक्षा यास आमचे प्राधान्य असून लीग आणि क्लब परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यानुसार कार्यरत राहील, असेही आयएसएलने स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, एटीके मोहन बागान, तसेच बंगळूर एफसी संघ गेले काही दिवस विलगीकरण प्रक्रियेमुळे हॉटेलमध्येच राहिले. त्यांना मैदानावर सराव करता आला नव्हता. आयएसएल स्पर्धेत एटीके मोहन बागान संघ शेवटचा सामना 5 जानेवारी रोजी खेळला होता. बंगळूरचा स्पर्धेतील अखेरचा सामना 10 जानेवारीस झाला होता. सध्या एटीके मोहन बागानचे 9 सामन्यांतून 15 गुण, तर बंगळूर एफसीचे 11 सामन्यांतून 13 गुण आहेत. स्पर्धेतील अन्य काही संघांनाही कोविडने ग्रासल्याचे वृत्त आहे. ओडिशा एफसी संघाचा गोलरक्षकही कोविड बाधित ठरल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

SCROLL FOR NEXT