ISL football

 

Dainik gomantak

क्रीडा

बंगळूरची निराशा कायम, जमशेदपूरविरुद्ध गोलशून्य बरोबरीचेच समाधान

त्यांची ही आठ लढतीतील तिसरी बरोबरी असून सहा गुण झाले आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील निराशा सोमवारीही कायम राहिली. त्यांनी जमशेदपूर एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले, पण दहाव्या क्रमांकावरून सुटका झाली नाही. सामना बांबोळी येथील एथलेटिक स्टेडियमवर झाला. संपूर्ण नव्वद मिनिटांच्या खेळात गोल नोंदविण्यास अपयश आल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे जमशेदपूरला दुसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली. त्यांची ही सात लढतीतील तिसरी बरोबरी होती.

12 गुणांसह ते आता दुसऱ्या स्थानी असून अव्वल क्रमांकावरील मुंबई (mumbai) सिटीपेक्षा त्यांचे तीन गुण कमी आहेत. बंगळूरला सलग दुसऱ्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांची ही आठ लढतीतील तिसरी बरोबरी असून सहा गुण झाले आहेत. बंगळूरच्या (bangalore) दहाव्या क्रमांकात फरक पडलेला नाही.

सामना संपण्यास सहा मिनिटे बाकी असताना बंगळूरला गोल करण्याची संधी होती, पण गोलपट्टीने त्यांचा घात केला व आघाडी हुकली. आशिक कुरूनियान याच्या असिस्टवर बदली खेळाडू सुनील छेत्रीने हेडिंग साधले होते, पण चेंडू एलन कॉस्ता याला आपटून गोलपट्टीस धडकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: दिवाळीच्या काळात राजयोगाची संधी, 'या' राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा; ग्रहांचा दुर्मिळ संयोग ठरणार फलदायी

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

SCROLL FOR NEXT