कालच्या विजयामुळे या मालिकेत बांगलादेशने 3-0 अशी आघाडी घेत मालिका देखील जिंकली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Ban vs Aus: सलग तिसऱ्या टी-20 सामना जिंकत बांगलादेशने रचला इतिहास

बंगलादेशने ऑस्ट्रेलियाचा (Bangladesh vs Australia) कालच्या विजयामुळे या मालिकेत बांगलादेशने 3-0 अशी आघाडी घेत मालिका देखील जिंकली आहे.

दैनिक गोमन्तक

ढाका: ऑस्ट्रेलियाचा संघ सद्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून, तेथे दोन्ही संघात 5 टी- 20 सामन्यांची मालिका (A series of T20 matches) सुरु आहे. यातील तिसरा सामना (The third match) काल पार पडला असून, बंगलादेशने ऑस्ट्रेलियाचा (Bangladesh vs Australia) सलग तीन सामन्यात पराभव करत धक्का दिला आहे. कालच्या विजयामुळे या मालिकेत बांगलादेशने 3-0 अशी आघाडी घेत मालिका देखील जिंकली आहे.

तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून कर्णधार महमुदुल्लाने 4 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर अष्टपैलू शाकिब अल हसनने 26 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे बांगलादेशने 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 127 धावा केल्या. 20 षटकांत 128 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला हे आव्हान देखील पेलविले नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 117 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर बांगलादेशच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. बांगलादेशच्या शोरिफुल इस्लामने सर्वाधिक 2 फलंदाजांना बाद केले.

ऑस्ट्रेलियासाठी लाजिरवाणा पराभव

ऑस्ट्रेलियाला बांगलादेशात आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या लाजिरवाण्या पराभावाला सामोरे जावे लागले नव्हते. बांगलादेशने तिसरा सामना जिंकत मालिकेवर देखील आपले नाव कोरले आहे. बांगलादेशने इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया विरुध्द मालिकेत विजय मिळविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT