Ind Vs Eng: भारताच्या डावाला पावसाने वाचविले, राहुलने सावरले

राहुल नाबाद 57 धावा, अँडरसन 2/15 (Ind Vs Eng)
Ind Vs Eng, 2nd Day Test match, 05 Aug, 2021. On KL Rahul, Joe Route &Umpire on the field
Ind Vs Eng, 2nd Day Test match, 05 Aug, 2021. On KL Rahul, Joe Route &Umpire on the fieldTweeter / @ICC
Published on
Updated on

Ind Vs Eng: इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या (1st Test Match) पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी नामोहरम करून सोडले होते. आणि भारताने बिनबाद 21 धावा बनवल्या होत्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला (Defensive Batting). इंग्लंडच्या गोलंदाजांनी (England Bowlers) सुद्धा भारतीय फलंदाजांवर (Indian Batsman) टिच्चून मारा केला.

Ind Vs Eng, 2nd Day Test match, 05 Aug, 2021. On KL Rahul, Joe Route &Umpire on the field
Virat Kohli 0, James Anderson 1: भारतीय कर्णधारावर धावांचा अजूनही दुष्काळ

भारताची रोहित शर्मा व के एल राहुल (Opener Batsman Rohit & Rahul ) हे सलामी ची जोडी शतकी भागीदारी करतात (Near 100 partnership) असे वाटत असताना रोबिन्सनच्या (Robinson) उसळत्या चेंडूवर रोहित शर्मा नेहमीप्रमाणे पुलचा फटका (Pull shot) मारायला गेला आणि झेलबाद झाला त्यावेळी भारताच्या धाव फलकावर 97 धावा लागल्या होता. आणि सेट झालेला रोहित शर्मा 36 धावांवर बाद झाला. आणि त्यानंतर इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) आपल्या गोलंदाजीने गडी बाद कण्याची जादू दाखवायला सुरुवात केली. मग पुजारा 4 धावा(Pujara), कर्णधार विराट कोहली 0 धावा (Captain Kohli O), तर अजिंक्य राहणे 5 धावा (Ajinya Rahane, Run out) करू शकले. इंग्लंड तर्फे अँडरसनने सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजी केली त्याने टाकलेल्या 14 षटकांमध्ये 15 धावा देत पुजारा व विराट कोहली या 2 महत्त्वाच्या गडींना टिपले. परंतु भारताचा डाव अडचणीत येता येता भारताच्या मदतीला पाऊस धावून आला त्यामुळे भारताची अवस्था चार बात 125 अशी झाली व पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

राहुलचा बचावात्मक पवित्रा

एका बाजूने के एल राहुल शांतपणे आणि सावधतेने टिकून राहिला. व 151 चेंडूंचा सामना करताना 57 धावांवर नाबाद राहिला. त्याच्यासोबत भारताचा यष्टीरक्षक धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत 8 चेंडूत 7 धावा काढून नाबाद राहिला(Wicket keeper Batsman Rishabh Pant).

संक्षिप्त: धावफलक इंग्लंड पहिला डाव 183, भारत पहिला डाव 4 बाद 125 (के एल राहुल नाबाद 57, रोहित शर्मा 36, अँडरसन 2/15, रोबिन्सन 1/32)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com