Bangladesh Vs Australia Cricket match at Dhaka Bangladesh. (Ban Vs Aus) Tweeter / @ICC
क्रीडा

Ban Vs Aus: ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने चोपले

नसूर अहमदने १९ धावांत ४ बळी टिपून ठरला सामनावीर (Ban Vs Aus)

Siddhesh Shirsat

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया (BAN Vs AUS) यांच्यामध्ये सुरू झालेल्या पाच टी20 (T20 Cricket) सामन्यांपैकी पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. टी20 वर्ल्ड कप काही महिन्यातच येऊन ठेपला असताना ऑस्ट्रेलियन संघाचा T20 मधील खराब फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. कारण बांगलादेश विरुद्ध ची मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची वेस्टइंडीज विरुद्ध T20 मालिका झाली होती आणि या मालिकेमध्ये सुद्धा वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ban Vs Aus)

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका (Dhaka) येथे झाला, या सामन्यांमध्ये बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 131 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर ठेवले होते. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशी संघ सपेशल ढेपाळला. त्यामुळे बांगलादेश संघ मोठी धावसंख्या उभारून शकला नाही. ऑस्ट्रेलिया संघासाठी जोश हेजलवुड या गोलंदाजाने 3 तर मिचेल स्टार्क ने 2 गडी बाद केले. दुर्दैवाची गोष्ट ही की बांगलादेशने ठेवलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 108 धावाच बनवू शकला. ऑस्ट्रेलिया संघामध्ये मीचेल मार्शने सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले. पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयासह बांगलादेशने मालिकेमध्ये 1 - 0 आघाडी प्राप्त केली आहे.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जोश हेजलवुड याने सौम्य सरकारला 2 धावांमध्ये स्वस्तात बाद करत ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य ठरवला, त्यानंतर बांगलादेश संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले, यामध्ये बांगलादेशचे केवळ चारच फलंदाज आणि दोन अंकी आकडा पार करू शकले. यामध्ये मोहम्मद नईम 30, शकीब अल हसन 36, कर्णधार महमुदुल्लाह 20 आणि अफिक हुसैन 23 यांचा समावेश आहे

माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ देखील गडगडला. सलामी फलंदाज ॲलेक्स केरी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला त्याला मेहंदी हसन याने बाद केले. कालांतराने ठराविक अंतराने जोश फिलिपी सुद्धा 9 धावांवर बाद झाला, त्यानंतर आलेल्या मोईजेस ऑनरीकेज एक धाव करून शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाच्या 11 धावांवर 3 गडी स्वस्तात बाद झाले असताना मिचेल मार्श व कर्णधार मॅथ्यू वेडने पारी सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु 50 धावांच्या जवळ असतानाच नसूर अहमद (Nasur Ahmad) या गोलंदाजाने वेडला बात करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. वेड 23 चेंडू मध्ये 13 धावा बनवू शकला परंतु मीचेल मार्शने हार न मानता 45 चेंडू मध्ये चार चौकार व एका षटकारासह 45 धावा बनवल्या आणि तो देखील नसून अहमदच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. बाकीचे फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ केवळ 108 धावांमध्ये तंबूत परतला.

विजयाचा शिल्पकार - नसूर अहमद

बांगलादेश साठी विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे गोलंदाज नसून अहमद त्याने आपल्या चार वरच्या कोट्यामध्ये 19 धावा देऊन चार फलंदाजांना बाद केले त्याच्याशिवाय मुस्तफिजुर रहमान व शरीफ उल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT