पणजी: गोव्यातील दोन फिलाटेलिस्ट (Philatelist) (पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करणारे) ऑलिंपिक इंडिया 2021 अंतर्गत ऑलिंपिक गेम्स आणि स्पोर्टस् यावर पहिल्या व्हर्च्युअल फिलाटेलिस्ट प्रदर्शनात (In the philatelist exhibition) सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन 23 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन असेल. ऑलिंपिकमधील खेळांचा केलेला अभ्यास आणि त्यातील खेळांची ओळख होण्यासाठी केलेले प्रयत्न हा या प्रदर्शना मागील खरा हेतू आहे. या प्रदर्शनाला 'ऑलिंपिक फिनाले' ('Olympic Finale') म्हणून ओळखले जाते.
डॉ. एम आर रमेश कुमार आणि प्रतीक भंडारे अशी या दोन फिलाटेलिस्टची नावे असून, कुमार हे 'अधुनिक ऑलिंपिकमधील एक फिलाटेलिक प्रवास' यावर प्रदर्शन सादर करणार आहेत. तर प्रतीक भंडारे हे 'सिटीज ॲथलिटस् फोर्टियस' नावाचे प्रदर्शन सादर करणार आहेत. 1896 मध्ये अथेन्स येथे पहिल्या ऑलिंपिक खेळांच्यावेळी एकूण बारा फिलाटेलिस्ट जारी करण्यात आले होते. हे ऑलिंपिकच्या थीमवरील पहिले तिकिट जारी केले. यानंतर अनेक देशांनी तिकिटे, पोस्टर्स, कार्डस, पत्रके, पुस्तिका आदी जारी करण्यास सुरुवात केली. भारतीय पोस्टने या परंपरेचे पालन केले आहे. 1968 च्या ऑलिंपिकपासून ही प्रथा सुरु झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.