Hussain Shanto Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs AFG: बांगलादेशी फलंदाजाचा मोठा धमाका, अफगाणिस्तानविरुद्ध 146 धावा काढत रचला इतिहास

Hussain Shanto: हुसेन शांतोने 24 वर्षे 293 दिवस वयात शतक झळकावून हा विश्वविक्रम केला आहे.

Manish Jadhav

BAN vs AFG: बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा युवा फलंदाज नजमुल हुसेन शांतोने 146 धावांची खेळी खेळून इतिहास रचला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. हुसेन शांतोने 24 वर्षे 293 दिवस वयात शतक झळकावून हा विश्वविक्रम केला आहे.

23 चौकार आणि 2 षटकार मारले

दरम्यान, हुसेन शांतोपूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) 5 फलंदाजांनी शतके झळकावली आहेत, हे सर्व खेळाडू 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. नजमुल हुसेनने पहिल्या डावात 146 धावा केल्या. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 23 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली

पहिली विकेट गेल्यानंतर नजमुल हुसेन शांतो आणि महमुदुल हसन जॉय यांनी पहिल्या डावात बांगलादेशसाठी दुसऱ्या विकेटसाठी 212 धावांची विक्रमी भागीदारीही केली आहे. याआधी, 2014 साली श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) कसोटीत इमरुल कायस आणि शमसुर रहमान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली होती, जी बांगलादेशकडून कसोटीत दुसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावणारे फलंदाज

मुरली विजय (भारत) – 35 वर्षे (अंदाजे), 2018

शिखर धवन (भारत) - 32 वर्षे (अंदाजे) 2018

शमरह ब्रूक्स (WI) - 30 वर्षे (अंदाजे), 2019/20

शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे) - 34 वर्षे (अंदाजे), 2020/21

शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे) - 34 वर्षे (अंदाजे), 2020/21

सामन्याची स्थिती

जर सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात नजमुल हुसेन शांतो आणि महमुदुल हसन जॉय यांच्या शानदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने स्थिती मजबूत केली. बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी निजात मसूदने पहिल्या डावात 5 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT