Babar Azam
Babar Azam  Dainik Gomantak
क्रीडा

'Babar Azam पाकिस्तानचा पंतप्रधान होईल...,' सुनिल गावस्करांचे भाकित; पाहा Video

दैनिक गोमन्तक

Sunil Gavaskar on Babar Azam: T20 विश्वचषक-2022 मधून बाहेर होण्याच्या मार्गावर उभा असलेला पाकिस्तान आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने मेलबर्नचे तिकीट बुक केले. जिथे अंतिम फेरीत त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने भारताच्या स्वप्नाचा चकनाचूर करत अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, 2009 मध्ये पाकिस्तानने ICC T20 विश्वचषक जिंकला होता, तर इंग्लंड 2010 चा चॅम्पियन होता. दरम्यान, जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेले सुनील गावस्कर यांनी बाबर आझमबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये अंतिम सामना

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जाणार आहे. याच मैदानावर 1992 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. 30 वर्षांपूर्वी एमसीजीमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली 'मेन इन ग्रीन' संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. विशेष म्हणजे, त्यावेळीही इंग्लंड समोर होता, ज्याला 22 धावांनी हरवून पाकिस्तान चॅम्पियन झाला होता. आता हा विचित्र योगायोग आहे की, मैदानही मेलबर्नचे आहे, अंतिम फेरीतील संघही पाकिस्तान आणि इंग्लंड आहेत.

गावस्कर यांचे भाकीत

चाहतेही हा योगायोग योग्य मानत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना वाटते आहे की, पाकिस्तान (Pakistan) टी-20 वर्ल्ड चॅम्पियन होईल. एवढेच नाही तर बाबर आझम भविष्यात पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकतो, असे बोलले जात आहे. इम्रान खानच्या बाबतीतही हे दिसून आले. 1992 चा विश्वविजेता कर्णधार इम्रान खान 2018 मध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान झाला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही चाहत्यांच्या भाकितावर शिक्कामोर्तब केला आहे.

बाबर 2048 मध्ये पंतप्रधान होणार का?

अ‍ॅडलेडमध्ये भारत आणि इंग्लंड (England) यांच्यातील दुसरा सेमीफायनल सुरु होण्यापूर्वी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी असे वक्तव्य केले. गावस्कर यांचा हा व्हिडिओही एका युजरने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ज्यामध्ये गावसकर हे म्हणताना दिसत आहेत की, 'जर पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर 2048 मध्ये बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होईल.' शेन वॉटसन आणि मायकेल अर्थ्टन यांनाही गावस्करांचे हे ऐकून हसू आवरता आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT