Babar Azam
Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

बाबर आझमने उघड केले पाकिस्तानी संघाच्या यशाचे रहस्य, सांगितली पुढची योजना

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानी संघ क्लीन स्वीप करण्यात यशस्वी झाला. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाचा हा नवा अवतार पाहायला मिळत आहे. संघाच्या यशाचे कारण खुद्द कर्णधार बाबर आझमनेच दिले आहे. संघात नवनवीन प्रयोग करत असून त्याचे चांगले परिणाम आम्हाला मिळाले असल्याचे बाबर सांगतात.

पाकिस्तानी कर्णधार म्हणाला, 'आम्ही आमच्या टिममध्ये अनेक नवनविन प्रयोग केले, नव्या योजना आखल्या आहेत. त्याचे योग्य आणि सकारात्मक परिणाम टिमला बघायला मिळाले. आम्ही बॅट आणि बॉलमध्ये वेगवेगळे संतुलन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सातत्य राखण्याचा प्रयत्न करू आणि आमची बेंच स्ट्रेंथ देखील तपासू."

मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आझम फलंदाजीत अपयशी ठरला आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला विश्रांती देण्यात आली, पण त्यामुळे पाकिस्तानच्या विजयात काही फरक पडला नाही. कर्णधार फलंदाजीत अपयशी ठरला असे अनेकदा घडत नाही, पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार हेडन वॉल्शने केवळ एका धावेवर बाद झाला.

पाकिस्तानी क्रिकेटला मोठा दिलासा

पण पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी हे एक आश्वासक चिन्ह होते. बाबर आझम म्हणाला की, त्याचे अनेक सहकारी गरजेच्या वेळी पुढे आले आणि त्यांनी चांगला खेळ दाखवला. सलामीवीर इमाम-उल-हक (68 चेंडूत 62) याने आणखी एक अर्धशतक झळकावले आणि त्याला प्लेयर ऑफ द सीरीज देण्यात आला, तर मधल्या फळीतील जोडी शादाब खान (78 चेंडूत 86) आणि खुशदिल शाह यांनी योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

MLA Disqualification Petition: कामत - लोबोंना दिलासा, पाटकरांना दणका; सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळली

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पुन्हा 7 पंजाबींची हत्या; पाकिस्तानच्या तीन प्रांतात फुटीरतावादाची आग का धगधगतेय?

SCROLL FOR NEXT