Babar Azam And Rohit Sharma
Babar Azam And Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: 'भाईचे पोट बाहेर येत आहे' बाबर अझमला ट्रोल करत हिट मॅनशी केली तुलना

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या यशाच्या शिखरावर आहे तर त्याचा फॉर्म चांगला चालला आहे. बाबर आझमने आपल्या खेळाच्या जोरावर पाकिस्तानातच नव्हे तर जगभरात नावकमावले आहे. मात्र त्यालाही सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. (Babar Azam has been trolled on social media and compared to Rohit Sharma)

बाबरला या ट्रोलचा सामना इतर कारणांमुळे नाही तर त्याच्या फिटनेसमुळे करावा लागत आहे. बाबरच्या पोटाची वाढ म्हणजेच ढेरी वाढल्यामुळे लोक त्याला ट्रोल करत आहेत आणि त्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माशी करत आहेत.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या नेदरलँडच्या दौऱ्यावर आहे तर येथे पाकिस्तान संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. या शानदार कामगिरीदरम्यान कॅप्टन बाबरने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोंमुळे युजर्सनी बाबरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बाबरचे पोट वाढत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे आणि ते कमी केले पाहिजे.

एका पाकिस्तानी यूजरने कमेंट केली की, 'भाईचे पोट बाहेर येत आहे. त्याबद्दल काहीतरी करा तुम्ही रोहित शर्मा बनू नका. यावर कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले की 'शायद आपका मतलब इंजमाम उल हक होगा दोस्त.

हिट मॅन बनण्यासाठी तुम्हाला 3 द्विशतकं झळकावी लागतील

बाबर आझमची रोहित शर्माशी तुलना केल्यावर काही चाहते संतापले आहेत. या यूजरला उत्तर देताना त्यांनी लिहिले की, 'रोहित शर्मा बनण्यासाठी तुम्हाला 3 ODI झळकावी लागतील. बाबर आझम हा महान फलंदाज आहे, पण त्याची तुलना हिट मॅनशी करू नका.

रोहित-बाबर या महिन्यात आमनेसामने येणार

या महिन्यात भारत आणि पाकिस्तानचा सामनाही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे तर यामध्ये रोहित शर्मा आणि बाबर आझम हे दोन्ही कर्णधार आमनेसामने येणार आहेत. वास्तविक, आशिया कप 27 ऑगस्टपासून UAE मध्ये खेळवला जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. तसेच चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

SCROLL FOR NEXT