Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam Record: बाबरचा जलवा कायम! रिकी पाँटिंगच्या 17 वर्ष जुन्या विक्रमाशी केली बरोबरी

Babar Azam Record: जगातील महान क्रिकेटपटू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली असून तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

Babar Azam Record: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम एकामागून एक विक्रम करत आहे. आता त्याने आणखी एक पराक्रम केला आहे. एक कर्णधार म्हणून बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने जगातील महान क्रिकेटपटू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी केली असून तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

दरम्यान, या बाबतीत टीम इंडियाचा (Team India) विस्फोटक फलंदाज विराट कोहलीही बाबर आझमच्या मागे आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत रिकी पाँटिंग आणि बाबर आझमनंतर 2013 मध्ये 22 अर्धशतके झळकावणारा मिसबाह-उल-हक येतो.

कोहलीला संधी नाही

त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव येते. कोहलीने 2017 आणि 2019 मध्ये 21-21 वेळा अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, तो इच्छित असला तरी हा विक्रम मोडू शकणार नाही. बाबर आझमने रिकी पाँटिंगच्या (Ricky Ponting) 17 वर्षे जुन्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 2005 मध्ये, रिकी पाँटिंगने 24 अर्धशतके झळकावली, जी एका कॅलेंडर वर्षातील अर्धशतकांची सर्वाधिक संख्या आहे. मात्र आता बाबर आझमने या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबरने 2022 मध्ये 24 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, बाबरला अजूनही पॉन्टिंगला हरवण्याची संधी आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका या महिन्यात 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे.

बाबरला पॉन्टिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे

जर बाबरने या कसोटीत आणखी अर्धशतके झळकावली तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 25 अर्धशतके करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल. 26 डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेत दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात बाबर आझमने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात 54 धावांची शानदार खेळी करत रिकी पाँटिंगच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

एवढेच नाही, तर बाबर आझमने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा तो पाकिस्तानचा 7 वा फलंदाज ठरला आहे. 2022 मध्ये बाबर आझमने कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्याशिवाय अझहर अली, युनूस खान, मोहम्मद युसूफ, इंझमाम-उल-हक आणि मोहसिन खान यांनी पाकिस्तानकडून हा पराक्रम केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT