Axar Patel Dance with fiancé Dainik Gomantak
क्रीडा

Axar Patel Marriage: गर्लफ्रेंडला 'मान मेरी जान' म्हणत थिरकला अक्षर, लग्नातील Video व्हायरल

अक्षर पटेल गर्लफ्रेंडबरोबर विवाहबंधनात अडकला असून त्याचा लग्नसोहळ्यातील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Axar Patel Marriage: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल गुरुवारी (26 जानेवारी) लग्नबंधनात अडकला. त्याने त्याची दीर्घकाळची गर्लफ्रेंड मेहा पटेलबरोबर लग्न केले. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्यांच्या संगीत सोहळ्यातील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अक्षर आणि मेहा यांनी कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत गुजरातमधील वडोदरा शहरात लग्नगाठ बांधली. त्यांचा हा लग्नसोहळा 3-4 दिवस सुरु होता. या सोहळ्यातील अक्षर आणि मेहा यांचा डान्स व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यामध्ये अक्षर आणि मेहा हे 'मान मेरी जान' या गाण्यावर डान्स करत आहेत. डान्स करत असताना अक्षर फलंदाजी करण्याची आणि कॅच घेण्याची मुव्हज देखील करतो. त्यांच्या या डान्सच्या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

याशिवाय अक्षर आणि मेहा यांच्या सप्तपदी घेताना आणि वरमाळा घालतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

या दोघांच्या लग्नसोहळ्यात भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट त्याची पत्नी रिन्नीसह उपस्थितीत होता. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ देखील मेहा आणि अक्षरला शुभेच्छा देण्यासाठी लग्नसोहळ्यात सहभागी झाला होता.

(Axar Patel dance with fiancé during his wedding ceremony)

गेल्यावर्षी केलेला साखरपूडा

अक्षर आणि मेहा यांनी गेल्यावर्षी 20 जानेवारी 2022 रोजी साखरपुडा केला होता. विशेष म्हणजे त्याचदिवशी अक्षरचा 28 वा वाढदिवसही होता. त्याने वाढदिवसाच्या दिवशीच मेहाला लग्नाची मागणी घालत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता एक वर्षाने हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.

दरम्यान, मेहा ही पेशाने डायटिशियन आहे. अक्षर आणि ती गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

अक्षरने घेतला ब्रेक

सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळत आहे. पण या मालिकेतून अक्षरने माघार घेतली होती. यामागे कौटुंबिक कारण सांगण्यात आले होते. पण आता अक्षरने लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमधून माघार घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अक्षर फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market: डिचोलीत बाजारपेठेला लाभला नक्षत्रांचा साज, नाताळाची लगबग; ख्रिसमससाठी खरेदी जोरात

Stray Cattles: रेडेघाटीतील भटक्या गुरांचा संचार आवरा, वाहनचालकांची मागणी; रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे मनस्ताप

सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

Verna Fire: भंगारअड्ड्याच्या मालकाचे सर्व आरोप खोटे, शरीफ कोणतेही भाडे देत नसल्याचा जुझे कुटुंबीयांचा दावा

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT