Axar Patel records during India vs Sri Lanka 2nd T20I Dainik Gomantak
क्रीडा

Axar Patel: श्रीलंकेला घाम फोडणारा अक्षर भल्याभल्यांना पडला भारी, नावावर केले 'हे' 3 रेकॉर्ड्स

अक्षर पटेलने श्रीलेकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान 3 मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात पराभवाचा धक्का बसला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकने 16 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पण असे असले तरी या सामन्यादरम्यान भारताच्या अक्षर पटेलने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

या सामन्यात भारतासमोर श्रीलंकेने 207 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 5 विकेट्स केवळ 57 धावांवरच गमावले होते. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता.

पण नंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अक्षर पटेल यांनी 91 धावांची भागीदारी रचली आणि भारताला सामन्यात परत आणले होते.

दरम्यान, सूर्यकुमार 51 धावा करून बाद झाला. पण अक्षरने त्याचा खेळ सुरू ठेवला होता. अखेर त्याला दसून शनकाने 65 धावांवर बाद केले. त्याने 31 चेंडूत केलेल्या या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघ 20 षटकात 8 बाद 190 धावाच करू शकला.

अक्षरने फलंदाजीपूर्वी या सामन्यात गोलंदाजी करताना दोन विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्या नावावर काही विक्रमही नोंदवले गेले.

अक्षरने केलेले विक्रम

  • अक्षर त्याच्या 6 षटकारांमुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने दिनेश कार्तिकच्या 4 षटकारांच्या विक्रमाला या यादीत मागे टाकले आहे.

  • तसेच अक्षरने भारतासाठी सातव्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी करण्याचाही विक्रम केला आहे. या यादीत त्याने रविंद्र जडेजाच्या नाबाद 44 धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. या यादीत नाबाद 41 धावांच्या खेळीसह दिनेश कार्तिक तिसऱ्या आणि 38 धावांच्या खेळीसह एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.

  • अक्षर एकाच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अर्धशतक आणि 2 विकेट्स घेणारा भारताचा तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी युवराज सिंगने 2009 साली श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. तसेच हार्दिकने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध अर्धशतक आणि 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केलेली.

श्रीलंकेचे द्विशतक

या सामन्यात श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 206 धावा केल्या. श्रीलंकेकडून कर्णधार दसून शनकाने सर्वाधिक नाबाद 56 धावा केल्या, तर कुशल मेंडिसने 52 धावांची खेळी केली. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT