Tokyo Olympics: Shripad Naik
Tokyo Olympics: Shripad Naik Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics निमित्त गोव्यात जागृती; राज्यभरात क्रीडा चळवळ उभारणार

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी टोकियो ऑलिंपिकनिमित्त (Tokyo Olympics) गोव्यात (Goa) जागृती आणि प्रसार कार्यक्रम होणार आहेत. या क्रीडा महोत्सवानिमित्त (Sports Festival) राज्यभरात क्रीडा चळवळ उभी करण्याचा प्रयत्न राहील, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि गोवा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. (Awareness and dissemination programs will be held in Goa on occasion of upcoming Tokyo Olympics)

टोकियो ऑलिंपिकनिमित्त 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत सलग 17 दिवस उत्तर गोव्यात पणजी येथील कदंब बसस्थानकाजवळ ऑलिंपिक महोत्सव होईल, तर दक्षिण गोव्यात मडगाव येथील आगाखान उद्यानात एक ऑगस्टपर्यंत दहा दिवस ऑलिंपिकविषयक कार्यक्रम होतील, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

दररोज संध्याकाळी पाच ते सात या कालावधीत पणजी व मडगाव येथे दोन्ही ठिकाणी ऑलिंपिकचे मोठ्या स्क्रीनवर सामने-प्रसारण दाखविण्यात येईल. या कालावधीत राज्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दररोज विविध खेळातील पाच खेळाडू, क्रीडा आयोजकांचा सत्कार करण्यात येईल. गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे गोमंतकीय प्रमुख, राज्य क्रीडा संघटनांचे आश्रयदाते यांचाही सन्मान केला जाईल, असे नाईक यांनी नमूद केले.

ऑलिंपिक जागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास राज्य सरकारचे पाठबळ लाभलेले नसून सारा निधी गोवा ऑलिंपिक संघटनेने पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून उभा केला आहे. एकूण अंदाजपत्रक पाच लाख रुपये असल्याचे गोवा ऑलिंपिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. हा उपक्रम गोवा ऑलिंपिक संघटना हा उपक्रम गोवा क्रीडा प्राधिकरण, कदंब वाहतूक महामंडळ, मडगाव नगरपालिका, रोटरी, रोट्रॅक्ट व म्हापसा जिमखान्याच्या राबवत आहे.

राजेंद्र गुदिन्हो टोकियोला जाणार

गोवा ऑलिंपिक संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने गोवा टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गुदिन्हो यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेने टोकियोस जाणाऱ्या शिष्टमंडळात निवड केल्याची माहिती गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई यांनी दिली. टोकियोतील साधनसुविधाविषयक अहवाल नंतर गुदिन्हो सादर करतील, असे प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले. टोकियो ऑलिंपिकसाठी बॉक्सिंगमधील तांत्रिक अधिकारी नियुक्त झालेले गोव्याचे लेनी डिगामा यांचे यावेळी गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे श्रीपाद नाईक यांनी अभिनंदन केले.

ऑलिंपिकनिमित्त विविध कार्यक्रम

- पणजी येथे सायलक रॅली, मिनी मॅरेथॉन

- फोंडा येथे मिनी मॅरेथॉन

- म्हापसा येथे मिनी मॅरेथॉन, इनडोअर टेनिस बॉल क्रिकेट सामना

- म्हापसा व मडगाव येथे उच्च माध्यमिक व माध्यमिक पातळीवर ऑलिंपिक प्रश्नमंजुषा

- मडगाव येथेही सायकल रॅली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT