Mitchell Marsh | World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Mitchell Marsh: 'तेव्हा मी फार...', वर्ल्डकपवर पाय ठेवण्याबद्दल अखेर मार्शने सोडलं मौन

World Cup 2023: मिचेल मार्शने वनडे वर्ल्डकपवर पाय ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यावर आता त्यानेच प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Australia's All-Rounder Mitchell Marsh opened up on Putting Feet On Cricket ODI World Cup:

भारतात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडला, ज्यात ऑस्ट्रेलियन संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने यासह तब्बल सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर अष्टपैलू मिचेल मार्शच्या एका फोटोची प्रचंड चर्चा झाली. वर्ल्डकप जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन करत असताना त्याने ट्रॉफीवर पाय ठेवलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावर आता खुद्द मार्शनेच प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचा तो फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी वर्ल्डकपचा हा अपमान असल्याचे म्हटले होते, तर काहींनी मार्शचे समर्थनही केले होते. मात्र, भारतातून या कृतीबद्दल मार्श प्रचंड ट्रोल झाला होता. त्यातच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील मार्शच्या या कृतीमुळे तो निराश झाल्याचे म्हटले होते.

मार्शची प्रतिक्रिया

आता ऑस्ट्रेलियातील SEN रेडिओ नेटवर्कशी बोलताना मार्शने याबद्दल भाष्य केले असून त्याने म्हटले आहे की अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता.

मार्श म्हणाला, 'त्यावेळी त्या फोटोमागे कोणत्याही प्रकारे अनादर करण्याचा हेतू नव्हता. मी त्यावेळी फार काही विचारही केला नव्हता. मला अनेकांनी सांगितले होते की तो फोटो व्हायरल झाला होता, पण मी सोशल मीडिया जास्त काही पाहिले नाही. त्यात काहीही नव्हते.'

मार्शने दुसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप

दरम्यान, मार्शने यंदा दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावला आहे. तो २०१५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचाही भाग होता. तसेच त्याने वर्ल्डकप जिंकल्याने तो आणि त्याचे वडील गॉफ मार्श ही पहिली वडील-मुलाची जोडी ठरली, ज्यांनी वनडे वर्ल्डकप जिंकला.

गॉफ मार्श हे ऑस्ट्रेलियाने 1987 साली सर्वात पहिल्यांदा मिळवलेल्या वर्ल्डकप विजयात सामील होते. त्यांनीही ऑस्ट्रेलियाला 2 शतकांसह 400 पेक्षा जास्त धावा करत वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

विशेष म्हणजे 1987 सालच्या वर्ल्डकपमधील सामने भारतही झाले होते. अंतिम सामना कोलकातामध्ये पार पडला होता. त्यामुळे मार्श पिता-पुत्रांनी एकाच देशात वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा देखील आता केला आहे.

मिचेल मार्शनेही वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शानदार खेळ केला. त्याने 10 सामन्यांत 49 च्या सरासरीने 2 शतकांसह 441 धावा केल्या, तसेच त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT