Marnus Labuschagne Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: जगातील 'या' नंबर 1 कसोटी फलंदाजाने घेतला मोठा निर्णय, WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना

WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जूनमध्ये ओव्हल येथे खेळवला जाईल. या सामन्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

IND vs AUS WTC Final 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) नंतर, टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final 2023) सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जायचे आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जूनमध्ये ओव्हल येथे खेळवला जाईल.

या सामन्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ग्लॅमॉर्गन संघासोबत इंग्लंडमध्ये आपली तयारी सुरु करेल.

WTC फायनलसाठी रवाना

भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेन इंग्लंडला रवाना झाला आहे.

तो येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) आणि अॅशेस (Ashes 2023) साठी तयारी करेल.

लाबुशेनने गेल्या वर्षी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ग्लॅमॉर्गनसोबत करार केला होता. यावेळीही तो त्याच संघाच्या वतीने खेळताना दिसणार आहे.

जगातील नंबर 1 कसोटी फलंदाज

मार्नस लॅबुशेन हा सध्या जगातील नंबर 1 कसोटी फलंदाज आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) मध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतो.

त्याचबरोबर, टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराही काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. अलीकडेच, त्याने ससेक्ससाठी कर्णधार म्हणून शानदार शतक झळकावले, जे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहे.

तसेच, 7 जून ते 11 जून या कालावधीत अंतिम सामना खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यासाठी संघ सादर करण्याची अंतिम तारीख 7 मे आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पण गेल्या वेळी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT