David Warner Dainik Gomantak
क्रीडा

धमाकेदार कामगिरीनंतर डेव्हिड परतला घरी मात्र लेकींनी लावला क्लास

या धमाकेदार कामगिरीनंतर वॉर्नर जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला जे स्वागत अपेक्षित होते ते झाले नाही.

दैनिक गोमन्तक

sआयपीएल 2022 (IPL 2022) डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) चांगले राहिले आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या नव्या संघासाठी त्याने या मोसमात सर्वाधिक 432 धावा ठोकल्या आहेत. मात्र, या धमाकेदार कामगिरीनंतर वॉर्नर जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला जे स्वागत अपेक्षित होते ते मात्र झाले नाही. (Australian opener David Warner revealed how their daughters react when left-hander fails to score century)

याउलट मुलींनी वॉर्नरचाच क्लास घेतला. याचे कारण म्हणजे वॉर्नरने आयपीएल 2022 मध्ये एकही शतक केले नाही. मात्र, वॉर्नरने आयपीएलच्या 15 व्या मोसमात 5 अर्धशतके नक्कीच झळकावली. पण, त्याला एकाही अर्धशतकाचे शतकात रूपांतर करता आलेले नाहीये. अशा स्थितीत वॉर्नरला तिन्ही मुलींचे टोमणे ऐकायला मिळाले आहेत.

ऑस्ट्रेलियाला परतल्यावर डेव्हिड वॉर्नरने फॉक्स न्यूजला मुलाखत दिली, त्यावेळी तो म्हणाला की, "हे खरोखर कठीण आहे, जेव्हा तू घरी येतोस तेव्हा तू आयपीएलमध्ये शतक का करू शकत नाहीस? आता त्यांना काय सांगू, तेही तितकं सोपं नाहीये.

मुलींना वॉर्नरची लवकर बडतर्फी आवडत नाहीये,

वॉर्नरची पत्नी कँडिसनेही या घटनेची आठवण करून देताना सांगितले आहे की, “मुलांना डेव्हिडचे आऊट होणे आवडत नाही. यानंतर मुलांना त्याला समजावून सांगणे कठीण होते. मी त्यांना समजावून सांगते की, त्याला शतक करता आले नसले तरी त्याने संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली आहे. पण, मुलींना डेव्हीडने प्रत्येक सामन्यात शतके झळकावीत असे वाटत असते.

वॉर्नरने आयपीएल 2022 मध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत

वॉर्नरच्या शानदार फलंदाजीनंतरही दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. दिल्लीला अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सकडून () पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे दिल्लीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. मात्र, 2021 आणि 2020 मध्ये दिल्लीच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. 2020 मध्ये संघाने अंतिम सामनाही खेळला होता. मात्र त्यावेळी ते विजेतेपदापासून हुकले. त्यानंतर मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत त्यांना पराभूत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT