‘वर्ल्ड रिकॉर्ड बनाएगा मेरा इंडिया’ भारत-आफ्रिका मालिकेचा प्रोमोमध्ये आमिरचा जलवा

या प्रिव्ह्यूमध्ये टीम इंडियाच्या T20 रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
Aamir Khan Ind Vs Sa T20 Series
Aamir Khan Ind Vs Sa T20 SeriesTwitter
Published on
Updated on

Aamir Khan Ind Vs Sa T20 Series: IPL 2022 संपल्यानंतर, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind Vs Sa) T20 मालिका खेळायची आहे. 9 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी एक प्रिव्यू रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार आमिर खान दिसत आहे. प्रिव्ह्यूमध्ये टीम इंडियाच्या T20 रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

टीम इंडियाने सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत, जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकला तर हा सलग भारतासाठी 13 वा विजय असेल जो एक मोठा विक्रम असेल. या विश्वविक्रमाकडे टीम इंडियाची नजर लागली आहे.

स्टार स्पोर्ट्सने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये आमिर खान दिसत आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, 'जिंकणे अवघड आहे, सलग 12 टी-20 जिंकणे त्याहूनही कठीण आहे. आमच्या खेळाडूंच्या टी-शर्टवर लागलेली माती त्याची या यशाची कहाणी सांगते आहे.

Aamir Khan Ind Vs Sa T20 Series
IPL FINAL 2022: IPL चा ट्रेंड गुजरात टायटन्सच्या बाजूने, 'नशीबाने साथ दिल्यास...'

आमिर खान म्हणतो की, 13 वा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, हा केवळ सामना नाही, तर विश्वविक्रम करण्याची संधी आहे. आकाशाएवढी सुंदर माझी निळी जर्सी आकाशाला भिडायला तयार आहे. 13 वा सामना जिंकून भारत माझ्यासाठी विश्वविक्रम करणार, माझा निळ्या माझा रंगावर विश्वास आहे.

आत्तापर्यंत सर्वाधिक सलग टी-20 जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तान, रोमानिया आणि भारताच्या नावावर आहे, ज्यांनी संयुक्तपणे सलग 12-12 सामने जिंकले आहेत. पहिल्या T20 मध्ये भारताने आफ्रिकेला हरवले तर विश्वविक्रम टीम इंडियाच्या नावे होईल.

Aamir Khan Ind Vs Sa T20 Series
'...जर RCB जिंकला तर', IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारे ठरणार 2 संघ

भारत-आफ्रिका T20 मालिका

• 9 जून - 1ला T20

• 12 जून - 2रा T20

• 14 जून - 3रा T20

• 17 जून - 4 था T20

• 19 जून - 5वा T20

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com